भिसी : महात्मा गांधी विद्यालयात ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने पंचाहत्तरी पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार समांरभ पार प़डला.
अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अनिल डेकाटे होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी राज्यमंत्री डाॅ. रमेश गजबे, जि. प. सदस्या ममता डूकरे, पं. स. सदस्य प्रदीप कामडी, प्रभारी मुख्याध्यापक अनिल पंधरे, सेवानिवृृत मुख्याध्यापक अशोक कष्टी उपस्थित होते. या प्रसंगी माजी राज्यमंत्री डाॅ. गजबे यांचे हस्ते पंचाहत्तरी पूर्ण झालेल्या बापूजी एंगलवार, बाबुराव देवतळे, काटोले, राजुरकर, गजभिये या ज्येष्ठ नागरिकांचा शाल-श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. भिसीतील सेवानिवृृृत झालेल्या मुख्याध्यापक, शिक्षक कर्मचारीवृृदांनी ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना करून हा सोहळा आयोजित केला. या सोहळ्यासाठी संघाचे अध्यक्ष गोपाल सावरकर, सचिव एन. टी. काटेखाये, ईश्वर घरत, ममता सातपुते व इतर ज्येष्ठ नागरिकांनी परिश्रम घेतले. संचालन कादर शेख यांनी तर प्रदर्शन प्रा. गिरटकर यांनी मानले. सत्कार समारंभाला भिसी व परिसरातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.