लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील अनेक वर्षांपासून शहरातील मालमत्ताधारकांकडे कोट्यवधींचा कर थकित आहेत. ही वसुली करणे मनपासाठी डोकेदुखीचे ठरले होते. अशातच मनपाने शास्ती माफ योजना सुरू केली आहे. विशिष्ट कालावधीत कराचा भरणा करणाऱ्यांना व्याजाची रक्कम माफ करण्यात येते. या योजनेला नागरिकांनीही प्रतिसाद दिल्यामुळे १५ दिवसात तीन कोटी पाच लाख रुपयांची कर वसुली मनपाने केली आहे.चंद्रपूर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. यासोबत मालमत्ताधारकांची संख्याही वाढत आहे. सद्यस्थितीत मनपा हद्दीत एकूण ८७ हजार ३१६ मालमत्ताधारक आहेत. या मालमत्ताधारकांना दरवर्षी मनपाकडे कराचा भरणा करावा लागतो. मात्र अनेक मालमत्ताधारक नियमित कराचा भरणा करीत नाही. मागील अनेक वर्षांपासून कराची ही थकबाकी वाढत जाऊन ४६ कोटी ५० लाखांवर गेली. कराची थकबाकी येत नसल्याने विकासकामांवरही परिणाम होत होता. ही थकबाकी वसूल करण्यासाठी मनपा प्रशासनाने मालमत्ताधारकांना नोटीस बजावल्या. ध्वनीक्षेपकावरून आवाहन केले. प्रसंगी जप्तीची कारवाईदेखील केली. मात्र प्रत्येक घरात जप्तीची कारवाई करणे शक्य नव्हते. तरीही ३१ जानेवारीपर्यंत मनपाच्या कर विभागाने २० कोटी सहा लाख करवसुली केली. त्यानंतर मनपाने एक योजना आखली. जे मालमत्ताधारक कराचा भरणा करतील त्यांचे व्याज माफ केले जाईल. १ फेब्रुवारीपासून ही योजना सुरू केली. याला नागरिकांना चांगला प्रतिसाद दिला. शास्ती माफ योजनेत १ ते १५ फेब्रुवारी या कालावधीत तब्बल तीन कोटी पाच लाख रुपयांची करवसुली मनपाने केली आहे. तरीही शहरातील मालमत्ताधारकांकडे अजून २३ कोटी ४५ लाख रुपयांचा कर थकित आहे.शासकीय कार्यालयांकडेही थकबाकीमनपा हद्दीत जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, सिंचन विभाग, पोलीस विभाग यासह अनेक शासकीय कार्यालयाच्या इमारती आहेत. यातील विविध शासकीय कार्यालयांनीदेखील मालमत्ता कर अनेक वर्षांपासून थकित ठेवला आहे. शासकीय कार्यालयाकडे एक कोटी ५६ लाख कर थकित असल्याची माहिती कर विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.‘त्या’ मालमत्ताधारकांकडे दोन कोटी थकितमहानगरपालिका प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी मालमत्ता करात वाढ केली होती. या करवाढीविरोधात शहरातील ४७ मोठ्या मालमत्ताधारकांनी न्यायालयात याचिका दाखल केली. हे प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ठ असल्याने त्यांच्याकडील मालमत्ता कर थकितच आहे. एक कोटी ८९ लाख रुपये एवढा हा थकित असलेला कर आहे.१ फेब्रुवारीपासून नवीन उपक्रम सुरू केला आहे. या कालावधीत कराचा भरणा करणाऱ्यांचे व्याज माफ केले जात आहे. नागरिकांनी तत्काळ कराचा भरणा करून मनपाला सहकार्य करावे.-तुकड्यादास डुमरे,कर विभाग प्रमुख, मनपा, चंद्रपूर.
शास्ती माफ योजनेत तीन कोटींची वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 10:05 PM
मागील अनेक वर्षांपासून शहरातील मालमत्ताधारकांकडे कोट्यवधींचा कर थकित आहेत. ही वसुली करणे मनपासाठी डोकेदुखीचे ठरले होते. अशातच मनपाने शास्ती माफ योजना सुरू केली आहे. विशिष्ट कालावधीत कराचा भरणा करणाऱ्यांना व्याजाची रक्कम माफ करण्यात येते. या योजनेला नागरिकांनीही प्रतिसाद दिल्यामुळे १५ दिवसात तीन कोटी पाच लाख रुपयांची कर वसुली मनपाने केली आहे.
ठळक मुद्देमनपाची मोहीम : अजूनही २३ कोटी ४५ लाख रुपयांचा कर थकित