लोकमत न्यूज नेटवर्कमूल : सव्वा लाख नागरिकांच्या सेवेसाठी असलेल्या मूलच्या उपजिल्हा रूग्णालयात वैद्यकीय अधिकाºयांच्या रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. येथे कार्यरत पाच वैद्यकीय अधिकाºयांपैकी चार अधिकाºयांचे स्थलांतर झाल्याने ऐन पावसाळ्याच्या दिवसात रूग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे रिक्त पदे भरावी, अशी मागणी करण्यात आली आहे.मूल तालुक्यातील नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ५० खाटांचे श्रेणीवर्धन उपजिल्हा रूग्णालयाची निर्मिती करण्यात आली. या रूग्णालयासाठी एक वैद्यकीय अधीक्षक, आठ वैद्यकीय अधिकारी, बारा परिचारिका अशा महत्त्वाच्या पदांची निर्मिती करण्यात आली.मात्र ती पदे भरण्यात आली नाही. काही पदे भरल्यानंतर जास्तीत जास्त वेळा वैद्यकीय अधिकाºयांना प्रतिनियुक्तीवर पाठविण्याचा सपाटा मधल्या काळात करण्यात आला. नागरिकांनी ओरड केल्यानंतर या रूग्णालयात सध्याच्या स्थितीत पाच वैद्यकीय अधिकारी कार्यरत होते. मात्र, यातील चार वैद्यकीय अधिकाºयांचे स्थलांतर झाल्याने रूग्ण सेवा ढेपाळली आहे. येथील डॉ. विवेक लांजेवार यांची ग्रामीण रूग्णालय राजुरा, डॉ. सचिन थेरे या बाल रोग तंज्ज्ञाची बदली नाशिक जिल्ह्यातील नांदगाव, डॉ. सुषमा नितनवरे यांची जिल्हा रूग्णालय बुलढाणा तर डॉ. हर्षाली घुगल यांना सिंदेवाही ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आले आहे. स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. रेवतकर यांनी राजीनामा दिल्याने महिलांसाठी असलेल्या महिला तज्ज्ञांची उणीव निर्माण झाली आहे.सध्या स्थितीत वैद्यकीय अधीक्षक डॉ. सूर्यकांत बाबर व वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्वल इंदूरकर कार्यरत आहेत. यातच १२ पैकी पाच परिचारिका कार्यरत आहेत. दररोज रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असतानाच वैद्यकीय अधिकारीच नसल्याने रुग्णांसमोर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे रुग्णांच्या संख्येत काही प्रमाणात वाढ झाली असून काही रुग्ण खासगी रुग्णालयाचा आधार घेत आहे. त्यामुळे वैद्यकीय अधिकाºयांचे रिक्त असलेले पद भरून रुग्णांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
उपजिल्हा रूग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांचे ग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 12:19 AM
वैद्यकीय अधिकाऱ्यांचे रिक्त पदे भरावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मूल तालुक्यातील नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ५० खाटांचे श्रेणीवर्धन उपजिल्हा रूग्णालयाची निर्मिती करण्यात आली. या रूग्णालयासाठी एक वैद्यकीय अधीक्षक, आठ वैद्यकीय अधिकारी, बारा परिचारिका अशा महत्त्वाच्या पदांची निर्मिती करण्यात आली.
ठळक मुद्देचार अधिकाऱ्यांचे स्थलांतर : पावसाळ्याच्या दिवसात रुग्णांची हेळसांड