लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनाकरिता वरदान ठरु पाहणारा बहुचर्चित लाल व पोथरा कालवा अनेक समस्यांनी ग्रस्त आहे. या कालव्यास बेलगाव नजीक मागील कित्येक दिवसांपासून भगदाड पडले असल्याने ग्रामस्थांना अडीच किमीचा फेरा मारावा लागत आहे.वरोरा तालुक्यातील शेतकºयांना दुबार पीक घेता यावे, यासोबतच सिंचनाची सोय व्हावी याकरिता लाल व पोथरा कालव्याची निर्मिती करण्यात आली. या कालव्यास वर्धा जिल्ह्यातील धरणातून पाणी सोडले जाते. कालव्यातील पाण्यावर शेकडो शेतकरी विसंबून असतात. मात्र कालव्याची उन्हाळ्यात स्वच्छता केली जात नसल्याने शेतीच्या हंगामात कालव्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी जात नाही. अनेक ठिकाणी कालवा फुटल्याने पाणी व्यर्थ जात असते. अशा अनेक बाबी मागील कित्येक वर्षापासून कालव्यामध्ये घडत आहे. कालव्याला बेलगाव नजीक मोठे भगदाड पडले असून तीन महिन्यापूर्वी ग्रामस्थांनी पाटबंधारे विभागाकडे तक्रारही केली. परंतु, अद्यापही भगदाड बुजविण्याच्या कामाला सुरूवात करण्यात आलेली नाही. कालव्या नजीक एक नाला वाहतो. भगदाडातून पाणी नाल्यात गेल्यास पावसाळ्यात बेलगावला पुराचा धोका निर्माण होवू शकतो. त्यामुळे पावसाळ्यापुर्वी कालव्याचे भगदाड बुजविण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.बेलगाव येथे कालव्याला भगदाड पडल्याची माहिती तांत्रिक विभागाकडे देण्यात आली आहे. वरिष्ठ कार्यालयाकडे भगदाड दुरस्तीचे अंदाजपत्रक पाठविले आहे.- खुशाल झाडे, उपविभागीय अभीयंता वरोरा.
लाल-पोथरा कालव्याला भगदाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2018 11:43 PM
वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनाकरिता वरदान ठरु पाहणारा बहुचर्चित लाल व पोथरा कालवा अनेक समस्यांनी ग्रस्त आहे. या कालव्यास बेलगाव नजीक मागील कित्येक दिवसांपासून भगदाड पडले असल्याने ग्रामस्थांना अडीच किमीचा फेरा मारावा लागत आहे.
ठळक मुद्देसमस्या निर्माण होणार : लक्ष देण्याची मागणी