फोटो
चिमूर : १५ महिन्यांच्या कोरोना महामारीत लॉकडाऊन लागले. जनता त्रस्त झाली. त्यामुळे अनेकांचा रोजगार, व्यापार बुडाला. उद्योग बंद असल्यामुळे बेरोजगारी वाढली. असे असताना केंद्र सरकार पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किमती वाढवीत आहे. याचा परिणाम महागाई वाढण्यावर होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने तत्काळ पेट्रोल, डिझेल, गॅसच्या वाढविलेल्या किमती कमी कराव्यात, अशी मागणी विदर्भ राज्य आंदोलन समितीने केली आहे.
यासंदर्भातील निवेदन मंगळवारी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान व पेट्रोलियममंत्री यांना पाठविले आहे. कोरोनाच्या काळात इंधनाच्या किमती वाढल्यामुळे वाहतूक खर्च वाढला. उत्पादन खर्च वाढला, याचा परिणाम महागाई आली आहे. यावेळी निवेदन देताना विदर्भ राज्य आंदोलन समितीचे व माजी राज्यमंत्री रमेशकुमार गजभे, नरेंद्र राजूरकर, डॉ. संजय पिठाडे, गजानन अगडे, प्रकाश बोकारे, लीला नंदरधने, बाळकृष्ण बोभाटे, सारंग दाभेकर, अनिल रामटेके आदी उपस्थित होते.