शहरं
Join us  
Trending Stories
1
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
2
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
3
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
4
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
5
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
6
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
7
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ
8
माझा पुढचा जन्म 'या' राज्यातच व्हावा, अशी माझी इच्छा आहे; धीरेंद्र शास्त्री यांचं विधान
9
"लेबनानमधील पेजर हल्ला हा इस्रायलचा 'मास्टरस्ट्रोक', भारतात जर असा प्रयत्न झाला तर..."
10
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 
11
तिरुपती लाडू भेसळ प्रकरणाचा तपास एसआयटीकडून स्थगित, सांगितलं 'हे' कारण...
12
विराट कोहलीपेक्षा अब्दुला शफीकचा रेकॉर्ड चांगला आहे; पाकिस्तानच्या कर्णधाराचा दावा
13
"अंबानींच्या लग्नावर करोडोंचा खर्च, पण शेतकरी...", राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
14
रोहित की गंभीर? कानपूर टेस्टमध्ये ट्विस्ट आणण्यात नेमकं कुणाचं डोकं?
15
सासूच्या मृत्यूची बातमी, तरीही सेटवर हसत होती 'ही' अभिनेत्री, नवऱ्याने असं केलं रिएक्ट
16
“भाजपासाठी महाराष्ट्र हे ATM, मोदी-शाह यांच्या दौऱ्याचा मविआलाच फायदा”; काँग्रेसची टीका
17
"विमानांप्रमाणे आता एसटीच्या ई- शिवनेरी बसमध्ये दिसणार शिवनेरी सुंदरी’’, भरत गोगावले यांची घोषणा
18
Irani Cup 2024 : मैं हूँ ना! मुंबईचा खडतर प्रवास; पण अजिंक्य रहाणेचा 'संयम', अय्यर-सर्फराजची चांगली साथ
19
'घड्याळ' चिन्हाबाबत आजही सुनावणी झालीच नाही; सुप्रीम कोर्टाने दिली पुढची तारीख
20
जय पवार की अजित पवार, बारामतीतून कोण लढणार? प्रदेशाध्यक्षांनी गोंधळ संपवला

विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2021 4:20 AM

तळोधी बा : गोंडवाना विद्यापीठाने मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र २०२०-२१ च्या शैक्षणिक शुल्कात कपात आणि सर्व विद्यार्थ्यांचे सत्र २०२१-२२ ...

तळोधी बा : गोंडवाना विद्यापीठाने मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र २०२०-२१ च्या शैक्षणिक शुल्कात कपात आणि सर्व विद्यार्थ्यांचे सत्र २०२१-२२ च्या शैक्षणिक शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच उन्हाळी २०२१ च्या परीक्षा शुल्कात १० टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेने घेतला आहे.

कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांकडून महाविद्यालय अतिरिक्त शुल्क आणि परीक्षा शुल्क घेत होते. याच्या विरोधात अभाविप गडचिरोली शाखेने १ मार्चला विद्यापीठाला निवेदन दिले. तसेच अभाविपतर्फे झालेल्या ऑनलाईन आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना घेऊन दिलेल्या निवेदनाचा पाठपुरावा केल्यामुळे विद्यापीठाने २९ जूनला शैक्षणिक शुल्क आणि परीक्षा शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला. विद्यापीठाने शैक्षणिक शुल्क २०२०-२१ चे इंद्रधनुष्य, आव्हान, आविष्कार, विद्यार्थी कल्याण निधी, विद्यार्थी वैद्यकीय मदत शुल्क, विद्यार्थी संघ शुल्क, आपत्ती व्यवस्थापन शुल्क यामध्ये १०० टक्के कपात केली आहे आणि ग्रंथालय शुल्क, पर्यावरण शुल्क, प्रयोगशाळा शुल्कात ५० टक्के कपात केली. तसेच उन्हाळी -२१ च्या परीक्षा शुल्कात १० टक्क्यांनी कपात करण्यात आली. या निर्णयामुळे दोन लाख विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला.