लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प अंतर्गत पर्यटन शुल्कात कपात करण्याचे निर्देश राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले होते. त्यामुळे क्षेत्रसंचालक एन. आर. प्रवीण यांनी सवलतीचा आदेश जारी केला. स्थानिक रहिवासी सफारीसाठी पाच नाक्यांमधून जाणारे आॅनलाईन बुकींग तिकीटधारक पर्यटक, रिसोर्ट व होमस्टेधारक आणि कामगारांना सदर शुल्कापासून सूट देण्यात आली आहे.वनसरंक्षणाच्या दृष्टीने मोहूर्ली परिक्षेत्र अंतर्गत पद्मापूर व कोडेगाव, खडसंगी परिक्षेत्रात रामदेगी आणि चंद्रपूर (बफर) परिक्षेत्राअंतर्गत बोर्डा व मामला अशी एकूण पाच तपासणी नाके आहेत. यापूर्वी या तपासणी नाक्यावर शुल्क आकारले जात नव्हते. त्यामुळे या क्षेत्रात उपद्रवी लोकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढली. कुठेही थांबणे, सेल्फी काढणे, अशा प्रकारचे गैरवर्तन वाढले. यावर आळा घालण्यासाठी, महाराष्टÑ शासनाने राजपत्र, असाधारण भाग चार-अ १ मार्च, २०१४ नुसार महाराष्टÑ वन्यजीव संरक्षण नियम २०१४ मधील प्रकरण पाच, संरक्षित क्षेत्र कलम १८ (१) नुसार वन्यजीव क्षेत्रात प्रवेश करायचा असल्यास वरील पाच नाक्यांवर १ फेबु्रवारीपासून आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर प्रवेश सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजतोपर्यंत राहील. रहिवासी, सफारीसाठी आॅनलाईन बुकींग तिकीट असणारे पर्यटक, रिसोर्ट, होमस्टेधारक कामगारांना सदर शुल्कापासून सूट देण्यात आली, अशी माहिती क्षेत्रसंचालक प्रवीण यांनी दिली.
ताडोबा पर्यटन प्रवेश शुल्कात कपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2019 10:42 PM
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प अंतर्गत पर्यटन शुल्कात कपात करण्याचे निर्देश राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले होते. त्यामुळे क्षेत्रसंचालक एन. आर. प्रवीण यांनी सवलतीचा आदेश जारी केला. स्थानिक रहिवासी सफारीसाठी पाच नाक्यांमधून जाणारे आॅनलाईन बुकींग तिकीटधारक पर्यटक, रिसोर्ट व होमस्टेधारक आणि कामगारांना सदर शुल्कापासून सूट देण्यात आली आहे.
ठळक मुद्देवनमंत्र्यांचा निर्णय; आदेश जारी