लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ज्येष्ठ स्वातंत्रसंग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समुहाचे संस्थापकीय संपादक श्रध्देय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबुजी यांच्या जयंतीनिमित्त लोकमत व लाईफ लाईन ब्लड बँक कंपोनेट आणि अप्रायसेस सेंटर यांच्या वतीने सोमवारी २ जुलै रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिर डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृह, फुटक्या किल्ल्याजवळ, हॉस्पीटल वार्ड चंद्रपूर येथे आयोजित केले आहे.या उपक्रमात शहरातील अनेक सामाजिक व शैक्षणिक संस्थाही सहभागी होणार आहेत. रक्तदान म्हणजेच जीवनदान, रक्तदान केल्याने माणूस अशक्त होत नाही तर माणूसकी सशक्त होते. म्हणूनच या शिबिरात महाविद्यालयीन युवक, युवती, महिला, सरकारी व खासगी नोकरीतील कर्मचारी, सेवाभावी संस्था, सामाजिक, राजकीय कार्यकर्ते, क्रीडाप्रेमी आदींनी सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीकरिता सोनम मडावी (९९७५६६६३५५) व (७६२०७४७०७२) यांच्याशी संपर्क साधावा.लोकमत सखी मंच, वाचकांना आवाहनबाबुजींच्या जयंतनिमित्त होणाऱ्या या समाजिक उपक्रमात सखी मंच, लोमकतचे कर्मचारी, वार्ताहर, विक्रेते बंधू व वाचक यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. लाईफ लाईन ब्लड बँक कंपोनेट आणि अप्रायसेस सेंटर यांच्या सहकार्याने रक्तदान करणाºया प्रत्येक रक्तदात्याला ब्लड डोनर कार्डचे प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात येईल.
बाबुजींच्या जयंतीनिमित्त आज महारक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2019 10:24 PM
ज्येष्ठ स्वातंत्रसंग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समुहाचे संस्थापकीय संपादक श्रध्देय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबुजी यांच्या जयंतीनिमित्त लोकमत व लाईफ लाईन ब्लड बँक कंपोनेट आणि अप्रायसेस सेंटर यांच्या वतीने सोमवारी २ जुलै रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
ठळक मुद्देलोकमत व लाईफलाईन ब्लड बँक कंपोनेट आणि अप्रायसेस सेंटरचा पुढाकार