फारुख शेख पाटणगुजरात राज्यातील कछ जिल्ह्यातील शेळी-मेंढीचे पालन करून आपली व आपल्या कुटुंबीयांच्या पोटाची खडगी भरण्याकरिता गेल्या ५० वर्षापासून भटकंती करून मेंढपाळ जीवन जगत आहेत. मात्र अद्यापही त्यांच्यापर्यंत शासनाची कोणतीच योजना पोहचलेली नाही.प्रस्तुत प्रतिनिधीने त्यांच्या डेऱ्याला भेट दिली असता डेऱ्याचा प्रमुख पुना प्रभु रब्बारी याने समस्याचा पाढाच वाचून दाखविला. या डेऱ्यात १२ कुटुंब असलेल्या लोकांमध्ये कुटुंब प्रमुख प्रभु रब्बारी, सुरेश रब्बारी, रामा किशन रब्बारी, पाला जिवा रब्बारी, गोवा सोमा रब्बारी, रतन सोमा रब्बारी, जमा रवा रब्बारी, देवशी शामा रब्बारी, साजन भोला रब्बारी, रवा कुमार रब्बारी इत्यादींचा समावेश आहे. यामध्ये एकूण ६० लोकसंख्या आहे. पुरुष व महिलांसह बालकांचाही समावेश आहे. यांची दिनचर्या सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आपले बिऱ्हाड पाठीवर घेऊन शेळ्या-मेंढ्या व उंटाच्या मागे चालत राहणे व जिथे संध्याकाळ झाली, तिथे जंगलातच नदी नाल्याच्या काठावर आश्रय घेऊन पोटाची खडगी भरणे. या लोकांमध्ये नवजात बालकांपासून तर ८० वर्षापर्यंतचे वृद्ध आहे. पाऊस, वारा, वादळ व विजेचा कडकडातही डोंगराच्या कुशीत त्यांना रात्र काढावी लागते. आमची प्रत्येक रात्र वैऱ्याची असते. जंगली जनावरे व चोरांचाही सामना करावा लागतो, असे सांगताना अनेकांच्या डोळ्यात पाणी आले. १२ कुटुंबामध्ये एकूण ६० लोकात लहान मुले आहेत. अनेकांचा जन्म जंगलातच झाल्याचीे गंभीर बाब लोकांनी बोलून दाखविली. प्रभु नारंग रब्बारी हा ८० वर्षीय वृद्ध असून उभे आयुष्य त्याने वनवासातच घालविले.या समुदायातील अनेकजण अशिक्षित आहे. वणवण भटकून जीवन जगत असल्याने मुलांनाही शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. डेऱ्याचा प्रमुख रब्बारी याने सांगितले की मागील ५० वर्षापासून पूर्ण भारतभर आम्ही भ्रमण करीत असतो, आम्ही सर्व गुजरात राज्याचे रहिवासी आहोत. दु:खाचे डोंगर उरात घेऊन जीवन जगणाऱ्यांवर शासनाचेही दुर्लक्ष झाले आहे.नाल्याच्या पाण्यावरच आपल्या जनावरांचे व आपल्या कुटुंबाची तहान भागवावी लागते. सर्व कुटुंब जंगलातच वास्तव्य करीत असल्याने किराणा, राशन शहरातून जंगल मार्गाने १० ते १५ किमी अंतरावरून आणावे लागते
भटकंतीचे जीवन जगणाऱ्या मेंढपाळांकडे शासनाचे दुर्लक्ष
By admin | Published: October 04, 2015 1:58 AM