लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : एसटी महामंडळातील कामगारांना अपेक्षित व चांगली वेतन वाढ मिळण्यासाठी एसटीचा-शासनाचा अंगिकृत उपक्रम हा दर्जा काढून त्या ऐवजी शासनाचा विभाग म्हणून दर्जा द्यावा. त्यामुळे एसटीचे अर्थकारण बदलून कामगारांना सन्मानजक पगार वाढ मिळेल. संप काळात तथाकथित नेतृत्वाच्या अपरिपक्वतेमुळे वेतन वाढ मिळाली नाही.त्यावेळी केवळ यांच्या वेतन वाढीच्या मागणीत ‘वेतन आयोग’ हे दोनच शब्द अडचणीचे ठरले असल्याची टिका काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते व उपाध्यक्ष तसेच महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे अध्यक्ष कामगार नेते आमदार भाई जगताप यांनी केले.येथील चंद्रपूर नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात शनिवारी संघटनेचा विदर्भ विभागातील प्रमुख कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते. मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रपुर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश देवतळे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष व नगरसेवक नंदू नागरकर, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य सुनंदा जीवतोडे, नगरसेवक अमजद अली, नगरसेविका सुनिता लोढीया, जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष शिवाराव, कामगार नेते सुनील शिंदे, संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे, संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत काकडे, कार्याध्यक्ष बी.के.देशमुख, विजय बोरगमवार, विभागीय अध्यक्ष राजेश सोलापन आदी उपस्थित होते.जगताप पुढे म्हणाले, आजपर्यंत कधीही एसटी महामंडळातील कामगारांना वेतन आयोगाप्रमाणे वाढ मिळालेली नाही. मात्र आता वेतन आयोगाची मागणी करण्यात आली. या मागणीमध्ये ‘वेतन आयोग’ हे दोन शब्दच अडचणीचे ठरले. मात्र शब्द कोड्यात न गुंतता शासकीय कर्मचाºयांप्रमाणे वाढ मागीतली असती, तर हा प्रश्न मार्गी लागून अपेक्षित वाढ मिळाली असती, असे ते म्हणाले. तसेच परिवहन मंत्र्यांनी एसटीच्या प्रवाशांसाठी आणि एसटीच्या भविष्यासाठी अनेक चांगले उपक्रम राबविले आहेत. त्याचप्रमाणे एसटी महामंडळाला राज्य शासनाचा एक भाग म्हणून दर्जा देण्यासाठी योग्य त्या कायदेशिर प्रक्रिया पूर्ण कराव्यात, अशी मागणीही जगताप यांनी केली. यावेळी विभागीय सचिव गणेशसिंग बैस, रत्नाकर नंदनवार, सी.पी.राठोड, फैयाज पठाण, आयुब खान, फिरोज खान, रामा राठोड उपस्थित होते.
एसटीला शासनाच्या विभागाचा दर्जा द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 12:21 AM
एसटी महामंडळातील कामगारांना अपेक्षित व चांगली वेतन वाढ मिळण्यासाठी एसटीचा-शासनाचा अंगिकृत उपक्रम हा दर्जा काढून त्या ऐवजी शासनाचा विभाग म्हणून दर्जा द्यावा. त्यामुळे एसटीचे अर्थकारण बदलून कामगारांना सन्मानजक पगार वाढ मिळेल.
ठळक मुद्देभाई जगताप : एसटी कर्मचारी विदर्भ मेळावा