शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

जिल्हा परिषदेच्या जीर्ण इमारतींचे करणार निर्लेखन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 10:25 PM

जिल्हा परिषदअंतर्गत विविध ठिकाणी बांधण्यात आलेल्या कार्यालयीन इमारतींची स्थिती अतिशय वाईट असल्याने त्यांचे निर्लेखन करण्याचा प्रस्ताव विविध विभागांच्या प्रमुखांनी शुक्रवारी जि़ प़ च्या सर्वसाधारण सभेत ठेवला होता.

ठळक मुद्देसर्वसाधारण सभेत ठराव मंजूर : काँग्रेसच्या सदस्यांनी केला निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा परिषदअंतर्गत विविध ठिकाणी बांधण्यात आलेल्या कार्यालयीन इमारतींची स्थिती अतिशय वाईट असल्याने त्यांचे निर्लेखन करण्याचा प्रस्ताव विविध विभागांच्या प्रमुखांनी शुक्रवारी जि़ प़ च्या सर्वसाधारण सभेत ठेवला होता. या प्रस्तावाला मान्यता दिल्याने पुढील कार्यवाही येत्या काही महिन्यांत पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे़ दरम्यान, खरीप हंगाम सुरू होवूनही शेतकऱ्यांना बियाणे व सेंद्रीय खत उपलब्ध करून न दिल्याच्या निषेधार्थ काँग्रेस सदस्यांनी मनमानी कारभाराचा आरोप करून सभागृहातून बहिर्गमन केले़ शिवाय, प्रवेशद्वारा हातात फलक घेवून सत्ताधाऱ्यांविरूद्ध घोषणाबाजी केली.जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सर्वसाधारण सभेप्रसंगी जि़ प़ चे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे, समाज कल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, संतोष तंगडपल्लीवार, अर्चना जीवतोडे, गोदावरी केंद्रे व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. आरोग्य, शिक्षण, महिला बालकल्याण व पंचायत विभागाच्या इमारतींचे निर्लेखन करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. जीर्ण इमारतींच्या प्रश्नावर तातडीने निर्णय घेतला नाही तर नागरिकांची गैरसोय होत असतानाच भविष्यात धोका निर्माण होवू शकतो, अशी भूमिका सत्ताधारी सदस्यांनी मांडली़ त्यामुळे निर्लेखनाच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी प्रदान केली़ रमाकांत लोधे यांनी जिल्ह्यातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या विद्युत देयकांवरील खर्चाचा प्रश्न उपस्थित केला असता सन २०१७-१८ मध्ये २ कोटी ८५ लाख २५ हजार रुपये विद्युत देयकावर खर्च झाल्याचे नोंदवून पुढील वर्षासाठी २ कोटी ९० लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याचे उत्तर सभागृहात देण्यात आले. दरम्यान २१ मार्चच्या सर्वसाधारण सभेत चर्चेला आलेल्या प्रश्नांची उत्तरे अध्यक्षांनी का दिली नाही, असा प्रश्न काँग्रेसच्या सदस्यांनी यावेळी उपस्थित केला़ सत्ताधारी पदाधिकाºयांकडून कोणत्याही प्रश्नाचे समाधानकारक उत्तरे दिली जात नाही. जिल्ह्यातील नऊ हजार ७५० बोअरवेलचे क्लोरीनेशन युनिट बसविण्याबाबत वर्षभरापासून चालढकल केली जात आहे, असा आरोपही करण्यात आला़३७२ गावातील पाणी फ्लोराईडयुक्त आहे. तरीही सभागृहात याबाबतचे उत्तर देण्यात आले नाही. चिमूर व नागभीड तालुक्यातील धानाचे पुंजणे जळालेल्या शेतकऱ्यांचे पैसे न मिळाल्याचा प्रश्न भोजराज मरस्कोल्हे यांनी विचारला होता. नागरी सुविधा योजनेअंतर्गत ५० लाखांचा निधी भिसी ग्रामपंचायतला उपलब्ध झाला. मात्र, ई-निविदा व अंदाजपत्रक तयार न करता ग्रामसेवकाने तोंडी सूचना देऊन काम करायला लावले, असा आरोप गजानन बुटके यांनी केला़ या कामाला प्रशासकीय व तांत्रिक मान्यता नसून ग्रामसेवक राजेश येवले यांनी पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप करून फौजदारी कारवाई करण्यात यावी, तसेच ही ई-निविदा रद्द करावी, अशी मागणीही बुटके यांनी केली. परंतु, सत्ताधाºयांकडून कोणत्याही प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देण्यात आली नाही व चर्चाही घडवून आणली नाही असा आरोप काँग्रेसचे गटनेते डॉ. सतीश वारजूकर यांच्यासह इतर सदस्यांनी केला आहे. भिसी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर उपलब्ध नसल्याचा व हिरापूर येथील ऋषभ किरण धनविजय हा विद्यार्थी २०१२ मध्ये शिष्यवृत्ती परिक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरही शिष्यवृत्ती मिळाली नसल्याचा मुद्दाही यावेळी उपस्थित करण्यात आला.कृषी, आरोग्य प्रश्नांवरून विरोधक आक्रमकआरोग्य केंद्रांमध्ये गरोदर मातांच्या ग्लुकोज तपासणीच्या स्ट्रिप्स उपलब्ध नाहीत. गौतम निमगडे यांनी या समस्येकडे लक्ष वेधले. चंदनखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची समस्याही मांडण्यात आली. खरीप हंगाम सुरू होवूनही शेतकऱ्यांना बियाणे न मिळल्याने काँग्रेसच्या सदस्यांनी सत्ताधाºयांना धारेवर धरले. त्यामुळे जि. प. च्या सर्वसाधारण सभेत आक्रमक पवित्रा घेतल्याचे यावेळी दिसून आले.