आजघडीला संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव पाहता, या योजनेंतर्गत प्रशिक्षण देणे गरजेचे असल्याने छोटे व मोठे व्यापारी, किराणा दुकान, हॉटेल, पाणीपुरी पावभाजी, फळभाजी विक्रेते, रेस्टरेंट, राइस मिल, बेकरी, आइल मिल, शेव चिवडा, पापड, लोणचे विक्रेते यांनी नोंदणी करणे आवश्यक असल्याने त्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन तालुक्याचे प्रमुख राज पाटील यांनी केले आहे.
शहरात व्यवसाय करणाऱ्या व्यापारी व व्यावसायिकांनी अन्न सुरक्षितेसाठी प्रशिक्षण व नोंदणी करणे गरजेचे आहे, पण या नोंदणीसाठी टाळाटाळ करणाऱ्या व्यावसायिकांचे प्रमाणपत्र नूतनीकरण होणार नाही. योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यासह तालुक्यात शिबिर व सर्वेक्षण करण्यात येणार आहे. तालुक्यातील अधिकृत प्रतिनिधीकडून व्यापाऱ्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन राज्य समुपदेशक आर.जे. वाहूरवाघ यांनी केले आहे. तालुक्याच्या व्यापारी व व्यावसायिकांनी नोंदणीकरिता राज पाटील यांच्याशी संपर्क साधावा.