आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या १६ मार्च २०१८ च्या अधिसूचनेनुसार प्रत्येक क्षयरुग्णांची नोंदणी, उपचार व क्षयरोगाचा प्रसार रोखणे, नियमित उपचारास प्रतिसाद न देणाऱ्या क्षयरोगाच्या वाढत्या प्रसारास आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्याची तरतूद आहे. खासगी क्षेत्रातील वैद्यकीय संस्था, क्षयरोग निदान करणाऱ्या जिल्ह्यातील सर्व पॅथोलॉजी, मायक्रोबायोलॉजी प्रयोगशाळा, रेडीओलॉजी सुविधा, क्षयरुग्णांवर उपचार करणारे विविध पॅथीची सर्व रुग्णालये, बाह्य रुग्ण व अंतर रुग्ण सुविधा देणरे सर्व डॉक्टर्स, क्षयरोगाची औषधे विकणारे सर्व औषध विक्रेत्यांना हा नियम लागू करण्यात आला.
ज्या प्रयोगशाळा, डॉक्टर, रुग्णालये व औषध विक्रेते रुग्णांची नोंदणी करणार नाहीत, अशा संस्था, व्यक्ती क्षयरोगाचा प्रसार करण्यासाठी जबाबदार धरून भादंवि २६९, २७० नुसार कारवाईसाठी पात्र आहेत. या कलमातंर्गत दोषी ठरलेल्या व्यक्तिला किमान ६ महिने ते २ वर्षांपर्यंत शिक्षा व दंडाची तरतूद आहे, अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. साठे यांनी दिली.