जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन
भद्रावती : सध्या ग्रामीण भागातील जनता आणि पोलीस प्रशासन यांच्यातील एकमेव दुवा म्हणजे पोलीस पाटील. प्रत्येक पोलीस पाटील यांना त्वरित मानधन मिळावे, त्यांच्यावर प्रशासकीय कामकाज करतेवेळी मारहाण झाल्यास किंवा धमकी मिळाल्यास गुन्हेगारावर ३५३ अंतर्गत कठोर कारवाई करावी, पोलीस पाटील यांचा २०१२ पासून ते आजपर्यंत मासिकभत्ता देण्यात यावा, अशी मागणी भद्रावती येथील नवनियुक्त पोलीस पाटील योगेश मते यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे.
पोलीस पाटील हे नेहमी तंटा सोडविण्याची मुख्य भूमिका बजावतात. प्रशासनाला वेळोवेळी योग्य सहकार्य करून आपली जबाबदारी पार पाडतात. त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचे कृत्य घडू नये यासाठी भद्रावती पोलीस पाटील यांनी एक पाऊल पुढे उचलून जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले आहे. निवेदन देताना भद्रावती येथील योगेश मते, दीपक शेंबळकर, सचिन झाडे, राजेंद्र पोईनकर, दिवाकर ढोले, राजेंद्र वांढरे उपस्थित होते.
===Photopath===
170621\img-20210617-wa0020.jpg
===Caption===
पोलीस पाटील यांचे मानधन नियमितपणे खात्यात जमा करा.