लोकमत न्यूज नेटवर्कभेजगाव : येथून जवळच असलेल्या मूल तालुक्यातील भेजगाव परिसरातील सिंतळा, येरगाव, पिपरीदीक्षित, चकबेंबाळ, चकघोसरी, दुगाळा माल, चकदुगाळा, गडीसुर्ला आदी गावात सिलेंडर गॅसचा पुरवठा नियमित होत नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने दखल घेवून ग्रामीण भागात सिलिंडर गॅसचा पुरवठा नियमित करावा, अशी मागणी येरगावचे माजी सरपंच संजय फुलझले यांनी केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून महिलांचा सन्मान करीत घराघरात स्वस्त दरात गॅस कनेक्शन दिले, तर वनविभागाच्या वतीने वनहक्क समितीच्या माध्यमातून जंगल व्याप्त व जंगल शेजारील गावांना गॅस कनेक्शन दिले. यामुळे वृक्षतोड कामे होवून गावे धुरमुक्त झाली. शासनाच्या योजनेमुळे ग्रामीण भागात गॅस धारक वाढले. मात्र सिलिंडर पुरवठा करणारी यंत्रणाच तोकडी पडत असल्याने महिलांना त्रास सहन करावा लागत आहे.मूल येथे सिलिंडर वितरणासाठी एकमेव एजन्सी आहे. या एजन्सीच्या माध्यमातून ग्रामीण भागात साप्ताहिक दिवस ठरवून सिलिंडरचा पुरवठा केला जातो. मात्र या एजन्सी ग्रामीण भागात नियमित पुरवठा न करता तीन-तीन आठवडे फिरकतही नसल्याने ग्रामस्थांना गॅस सिलिंडरसाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.भेजगाव परिसरातील ही गावे मूल तालुक्याच्या अगदी टोकावर असून तालुक्याचे अंतर २०-२५ किमी आहे. सिलिंडरची गाडी भेजगाव मार्गे किंवा फिस्कुटी मार्गे आली तरी अर्ध्याच गावात सिलिंडरचा पुरवठा होतो. त्यामुळे या गावांना सिलिंडर पुरवठा होत नसून ग्रामस्थांना ताटकळत उभे राहावे लागते. यामुळे या गावातील पिपरी दीक्षित येथे वितरणाचे केंद्र वाढवून या भागात नियमित गॅस पुरवठा करावा, अशी मागणी येरगावचे माजी सरपंच संजय फुुलझले यांनी केली आहे.
गॅस सिलिंडरचा पुरवठा नियमित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 10:52 PM
येथून जवळच असलेल्या मूल तालुक्यातील भेजगाव परिसरातील सिंतळा, येरगाव, पिपरीदीक्षित, चकबेंबाळ, चकघोसरी, दुगाळा माल, चकदुगाळा, गडीसुर्ला आदी गावात सिलेंडर गॅसचा पुरवठा नियमित होत नसल्याने ....
ठळक मुद्देमागणी : तीन-तीन आठवडे सिंलिंडरची प्र्रतीक्षा