जिल्हातंर्गत अत्यावश्यक सेवा वस्तू तसेच अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त इतर प्रकारची सेवा, वस्तू ई-कामर्सच्या माध्यमातुन सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत वितरीत करण्यास परवानगी आहे. नागरिकांना दुपारी ३ वाजता या वेळेनंतर वैद्यकीय किंवा इतर आणीबाणी प्रसंग तसेच घरपोच सेवा या कारणांशिवाय बाहेर येण्या-जाण्यावर निर्बंध आहे. राज्य शासन व स्थानिक प्रशासनाशी संबंधित सर्व शासकीय कार्यालये २५ टक्के कर्मचारी क्षमतेने कार्यरत राहतील. कोविड संबंधित अत्यावश्यक सेवांच्या कार्यालयांना यातून वगळण्यात आले आहे.
अशी आहे नियमावली
जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवाव्यतिरिक्त इतर सर्व प्रकारची एकल दुकाने, आस्थापना मॉल्स, शॉपिंग कॉम्प्लेक्स, सुपर बाजार, सलुन स्पा जिम इत्यादी वगळून) सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सुरू राहतील. एकल दुकाने, आस्थापने शनिवार व रविवार या दोन्ही दिवशी संपूर्णत: बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
१५ जूनपर्यंत आदेश लागू
दुकाने, आस्थापना यांना पुरवठा केल्या जाणाऱ्या वस्तुूच्या मालवाहतुकीवर निर्बध नाहीत. मात्र दुकानदारांना ठरवून दिलेल्या वेळेनंतर ग्राहकांना विक्री करता येणार नाही. हा आदेश जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात ७ जूनच्या सकाळी ७ वाजेपासून १५ जून २०२१ च्या सकाळी ७ वाजतापर्यंत लागू राहतील, असे असा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अजय गुल्हाने जारी केला आहे.