लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वातावरणातील बदल आणि वाढते पदूषण यामुळे जगासमोर मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत. मुबलक पाऊस पडायचा. कधीही दुष्काळ बघितला नाही. अशा भागात गेल्या १० वर्षांत दुष्काळ पडत आहे. चंद्रपूर जिल्हाही आता दुष्काळाच्या छायेत येत आहे. पर्यावरण देतच असते ते किती घ्यायचे? पर्यावरणाचा बॅलेन्स संपत चालला आहे. हे समजून घेतले पाहिजे. २०३० पर्यंत प्रदूषण कमी करायचे आहे. प्रत्येकांनी मनात आणले तर हे शक्य आहे. वृक्षलागवडीतून पर्यावरण पूरक काम करून वसुंधरेचे ऋण फेडण्याची ही संधी आहे, असे प्रतिप्रादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी वरोरा येथील आनंदवन येथे राज्यपातळीवरील ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेच्या शुभारंगप्रसंगी केले.वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात ५० कोटी वृक्ष लागवडीची घोषणा केली होती. गेल्या दोन वर्षांत २० कोटी वृक्ष लागवड करण्यात आली. यावर्षी राज्यभरात १ जुलै ते ३० सप्टेंबरपर्यंत ३३ कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. या मोहिमेचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आनंदवन येथून शुभारंभ झाला. या प्रसंगी वनसंवर्धन व वन्यजीव संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण कर्तव्य बजावणाऱ्या राज्यातील २२ वनाधिकारी, वनरक्षक, वनपाल, वनसंरक्षक, वनक्षेत्रपाल, विभागीय वनाधिकारी, कवायत शिक्षक, वनमजूर व वाहन चालकांचा मुख्यमंत्री फडणवीस व अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते सुवर्ण व रजत पदक देऊन सत्कार करण्यात आला.व्यासपीठावर वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, खा. अशोक नेते, आ. नाना शामकुळे, आ. कीतीर्कुमार भांगडिया, आ. अॅड. संजय धोटे ,आनंदवनचे विश्वस्त डॉ.विकास आमटे, डॉ. शीतल आमटे -करजगी,सिंगापूरचे कॉन्सिल जनरल गॅवीन चाय, इस्त्रायलचे कॉन्सिल जनरल याकोव फिंकलेस्टीन, अमेरिकेचे व्हाईस कॉन्सिल जनरल रॉबर्ट पॉल्सन, चंद्रपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजलीताई घोटेकर, प्रधान सचिव विकास खारगे, प्रधान मुख्य वनसंरक्षक उमेश अग्रवाल, मुख्य वनसंरक्षक एस.व्ही. रामाराव, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कडीर्ले, गायत्री परिवाराचे ज्येष्ठ डॉ. कालीचरण शर्मा, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरिष शर्मा, वरोºयाचे नगराध्यक्ष अहेतेश्याम अली, माजी मंत्री शोभाताई फडणवीस विराजमान होते. आनंदवनातून वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ होतोय याचा आनंद आहे. आनंदवनात आनंद आणि वनही आहे. बाबाआमटे यांनी मनाने हरलेल्यांना एकत्र करून त्यांची सेवा आणि सुश्रुषा केली. ते शरीराने दिव्यांग असले तरी मनाने मजबूत झाले आहेत. जो मनाने मजबूत असतो तो जग जिंकू शकतो, असेही मुख्यमंत्री म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वनविभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी केले. आनंदवनच्या विश्वस्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल आमटे -करजगी यांनी आनंदवनाच्या कार्याबद्दलची माहिती दिली.हरित महाराष्ट्राचे स्वप्न साकारायचेय - सुधीर मुनगंटीवारआनंदवन ही स्वर्गीय बाबा आमटे यांच्या कार्याने पुनित झालेली भूमी आहे. या भूमीतून वसुंधरेच्या रक्षणाचा संदेश महाराष्ट्राला जावा, या हेतूने आनंदवनातून ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला आहे. या माहिमेला वनसत्याग्रहाचे रुप प्राप्त व्हावे. शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हरित महाराष्ट्र व्हावा. हे आपले स्वप्न आहे. भविष्यात सर्वत्र पक्षांचा गोड आवाज ऐकू यावा. हे वैभव प्राप्त करायचे आहे. ‘वन है तो जल है, जल है तो जीवन है’. बँकेचे कर्ज माफ करता येते. मात्र वसुंधरेचे कर्ज कोणीही माफ करू शकत नाही. हे कर्ज फेडण्यासाठी प्रत्येकांनी वृक्ष लागवड करण्याची नितांत गरज आहे, असेही ना. मुनगंटीवार म्हणाले.राष्ट्रीय महामार्गालगत १२५ कोटी वृक्ष लावणार - नितीन गडकरीया कार्यक्रमात वृक्ष लागवड मोहिमेला शुभेच्छा देणारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची चित्रफित दाखविण्यात आली. यावेळी ना. गडकरी यांनी वृक्षलागवड मोहिम यशस्वी राबवित असल्याबद्दल वनमंत्री मुनगंटीवार व वनविभागाचे तोंडभरून कौतुक केले. यासोबतच राष्ट्रीय महामार्गालगत १२५ कोटी वृक्ष लावणार असल्याची घोषणाही केली.लागवड केलेले वृक्ष जगविण्यासाठी समित्याकाही लोक एकही वृक्ष लावत नाही. त्याचे संवर्धन तर दूरच राहिले. मात्र चांगल्या कामावर शंका उपस्थित करतात. जेवढ्या वृक्षांची लागवड केली जाईल. ते प्रत्येक वृक्ष जगलेही पाहिजे. म्हणूनच वृक्षसंवर्धनासाठी विविध पातळीवर समित्यांचे गठन केले जाणार आहेत. ग्रीन महाराष्ट्र वन महाराष्ट्र निर्माण करण्याचा संदेश महाराष्ट्रात पोहचवायचा आहे. यासाठी प्रत्येकांनी प्रतिज्ञा घेऊ या, असेही वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.पर्यावरणाचे महत्त्व सांगणारा अॅप आणणारप्रत्येक मनुष्याला जगण्यासाठी निसर्गातून घेणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा हिशेब देणारे मोबाईल अॅप वनविभागाच्या माध्यमातून तयार करण्यात येणार आहे. यामध्ये पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित केले जाणार आहे. आपण किती पाणी वापरतो. किती ऑक्सिजन घेतो. किती कार्बनडाय ऑक्साईड सोडतो. याचा हिशेब दिला जाणार आहे. पर्यावरणाचा ऱ्हास थांबावा, या दृष्टीने प्रत्येकाने कसा पुढाकार घ्यावा, हेसुद्धा त्यातून कळविले जाणार आहे, अशीही माहितीही यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणातून दिली.वृक्ष लागवडीवर लवकरच डाक तिकीटकेंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांच्या मार्गदर्शनात वृक्ष लागवडी संदर्भात काढायच्या डाक तिकीटा संदर्भातील पहिले कव्हर आज जारी केले आहे. त्याबद्दल त्यांचे आभार मानले. यावेळी त्यांनी महानगरांमध्ये घनदाट अरण्य निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरणाºया मियावाकी पद्धतीचा वनविभाग अवलंब करीत असल्याचे सांगितले. आनंदवनातून याची सुरुवात होत असल्याचेही ना.मुनगंटीवार यांनी जाहीर केले.
वृक्ष लागवडीतून वसुंधरेचे ऋण फेडावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2019 3:59 PM
वृक्षलागवडीतून पर्यावरण पूरक काम करून वसुंधरेचे ऋण फेडण्याची ही संधी आहे, असे प्रतिप्रादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी वरोरा येथील आनंदवन येथे राज्यपातळीवरील ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेच्या शुभारंगप्रसंगी केले.
ठळक मुद्देआनंदवनातून ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा शानदार शुभारंभ