लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : धार्मिक सहिष्णूतेतूनच देशाचा विकास होवू शकतो़ त्यामुळे संविधानातील मूल्यांच्या आचरणाला प्राधान्य दिले पाहिजे, असे मत लेखिका प्रा़ विमल गाडेकर यांनी व्यक्त केले़ संयुक्त महिला मंचच्या वतीने ईद मिलननिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या़२० वर्षांची परंपरा कायम ठेवत या वर्षीदेखील सर्वधर्म समभावचा संदेश देण्यासाठी महिला उत्साहाने उपस्थित झाल्या होत्या़ पंजाबी, ख्रिश्चन, बौद्ध, हिन्दू, मुस्लीम धर्मातील सेवाभावी कार्यकर्त्यांची संख्या यंदा लक्षवेधी ठरली़ सर्वांनी स्वत:च्या धर्माबद्दल माहिती दिली़प्रत्येक धर्म मानवतेचा संदेश देतो, हेही समजावून सांगण्यात आले़ ह्युमन वेलफेयर सोसाइटीच्या अध्यक्षा शाहिस्ता खान पठाण, ज्योती मकासरे, वनश्री मेश्राम, रिमाजी नारंग शकुंतला वरभे यांनी विचार मांडले़ सर्वांनीआपापल्या धर्मातील मानवतेचे मूल्य अधोरेखित केले़या उपक्रमाची परंपरा यापुढेही सुरू ठेवण्याचा संकल्प महिला कार्यकर्त्यांनी जाहीर केला़ पाहुण्यांना फळझाडे, फूलझाडे व भाजीपाल्याची झाडे तसेच बिया देऊन सत्कार करण्यात आला़ संचालन अश्विनी खोब्रागड़े यांनी केले. यावेळी गजानन राऊत, शालिनी भगत, शकुंतला वरभे, वर्षा कोडापे, नरसू पोलस्वार आदी उपस्थित होते.
धार्मिक सहिष्णूतेतूनच देशात शांती नांदेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 10:23 PM
धार्मिक सहिष्णूतेतूनच देशाचा विकास होवू शकतो़ त्यामुळे संविधानातील मूल्यांच्या आचरणाला प्राधान्य दिले पाहिजे, असे मत लेखिका प्रा़ विमल गाडेकर यांनी व्यक्त केले़ संयुक्त महिला मंचच्या वतीने ईद मिलननिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या़
ठळक मुद्देविमल गाडेकर : संयुक्त महिला मंचचा उपक्रम