चिमूर : जिल्ह्यात आधारभूत दराच्या खरेदी धानाचे शेतकऱ्यांना प्रलंबित जाहीरपैकी ५० टक्के प्राप्त बोनसचे वितरण योग्य प्रकारे होत असताना उर्वरित बोनस रक्कम तत्काळ देण्याची मागणी आमदार बंटी भांगडिया यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या पत्रातून केली आहे.
जिल्ह्यात शासकीय आधारभूत दराने शेतकऱ्यांचे दी महाराष्ट्र स्टेट को-ऑप. मार्केटिंग फेडरेशन लि. या संस्थेद्वारे खरीप व रब्बी धानाची खरेदी करण्यात आली. शासनाने अंदाजित २७ कोटींपैकी ५० टक्के बोनस वितरण केल्याचे निदर्शनास येत आहे. परंतु ५० टक्के बोनस वितरणात बरेच नोंदणीकृत व शासनास धान देऊन पात्र असलेले शेतकरी वंचित होत आहेत. जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांना १०० टक्के बोनस देण्यात यावा, जेणेकरून शेतकऱ्यांचे हित जोपासता येईल, असे आ. भांगडिया यांनी म्हटले आहे.