शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

विद्यापीठ कायद्यातील उणिवा दूर कराव्या!

By admin | Published: March 07, 2017 12:41 AM

कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक असून विद्यापीठ कायद्यातील उणिवांचा संघटनेने पाठपुरावा करावा.

किरण शांताराम : महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यावर कार्यशाळाचंद्रपूर : कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक असून विद्यापीठ कायद्यातील उणिवांचा संघटनेने पाठपुरावा करावा. प्राध्यापक संघटना अन्यायाला वाचा फोडण्याचे फार मोठे शस्त्र आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर गोंडवाना युनिर्व्हसिटी टिचर्स असोसिएशनचे मोठे कार्य गोंडवाना विद्यापीठात आहे, असे विचार चित्रपट निर्माते व दिग्दर्शक किरण शांताराम यांनी व्यक्त केले.‘महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ आणि सी.बी.सी.एस. पॅटर्न’ कार्यशाळेचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर गोंडवाना युनिर्व्हसिटी टिचर्स असोसिएशन तर्फे सरदार पटेल महाविद्यालय येथे करण्यात आले होते. यावेळी किरण शांताराम बोलत होते.या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे माजी प्रभारी कुलगुरू डॉ. कीर्तीवर्धन दीक्षित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव दीपक जुनघरे, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प (कोर) उपसंचालक डॉ. किशोर मानकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीचे सदस्य कुणाल घोटेकर, वनश्री कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.डी. निमसरकार, प्राचार्य वनश्री कला व विज्ञान महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश दहेगावकर, वर्धा येथील अनिकेत समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एम. कऱ्हाडे, सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश इंगोले, गो.ना. मुनघाटे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजा मुनघाटे, शरदराव पवार कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सिंग, संघटनेचे अध्यक्ष प्रा. सुधाकर पेटकर, सचिव डॉ. प्रमोद शंभरकर आदी उपस्थित होते.तसेच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक डॉ. भीमराव वाघमारे, आणि नेवजाबाई हितकारणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन.एस. कोकाडे यांनी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करून विद्यापीठ कायद्यातील बारकावे निदर्शनास आणून दिले. या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पी.डी. निमसरकर होते.याप्रसंगी आचार्य पदवीप्राप्त विविध महाविद्यालयातील प्राध्यापकांचा गौरव करण्यात आला. या कार्यशाळेत विविध महाविद्यालयातील ३६० प्राध्यापक उपस्थित होते. प्राध्यापक संघटनेच्या वाटचालीचा लेखजोखा डॉ. बाबासाहेब आंबेडकर गोंडवाना युनिर्व्हसिटी टिचर्स असोसिएशनचे सचिव डॉ. प्रमोद शंभरकर यांनी मांडला. संचालन प्रा. मृदुला रायपुरे यांनी केले. तर आभार प्रदर्शन डॉ. विद्याधर बनसोड यांनी केले. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष प्रा. डॉ. इसादास भडके, कोषाध्यक्ष डॉ. प्रकाश तितरे यांच्यासह सर्व पदाधिकारी व प्राध्यापकांनी अथक परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)