नारंडा येथे तलावाचे खोलीकरण सन २०१८-१९ मध्ये करण्यात आले होते. तलावाचे खोलीकरण झाल्यानंतर तलावात आता मुबलक प्रमाणात पाणीसाठा शिल्लक राहत आहे; परंतु या तलावाचा कालवा हा नादुरुस्त अवस्थेत असून, त्यामुळे तलावाचे पाणी हे कालव्यात सोडता येत नाही. परिणामी, परिसरातील शेतकरी हे सिंचनापासून वंचित राहत आहे, हा कालवा दुरुस्त झाल्यास परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनाची सोय निर्माण होईल. त्यामुळे कार्यकारी अभियंता, लघु सिंचाई विभाग, जिल्हा परिषद, चंद्रपूर व उपविभागीय अभियंता, जिल्हा परिषद, उपविभाग राजुरा यांना उचित निर्देश देऊन या विषयाबाबत कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी ताजने यांनी केली. यासंदर्भात मंजुरीकरिता पाठपुरावा करू, असे यावेळी जिल्हा परिषद सभापती उरकुडे यांनी आश्वासन दिले.
नारंडा येथील तलावाच्या कालव्याची दुरुस्ती करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 4:32 AM