विविध संघटनांसह मुख्याध्यापक असो.चे निवेदन
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा मुख्याध्यापक असोशिअएशन, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (शहर ), प्रजासत्ताक संघटना व शिक्षकेत्तर कर्मचारी आदी संघटनेने जिल्हाधिकारी तसेच शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेत राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना रोजगार हिरावून घेणारा अन्यायकारक शासन निर्णय राज्य सरकारने मागे घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान शासन निर्णयाची होळी करीत आपला निषेध नोंदविला.
यावेळी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आरटीपीसीआर चाचणी पाझेटिव्ह निघाले, अशा कर्मचाऱ्यांना रजा द्यावी, जिल्ह्यातील वर्ग ९ ते १२ वि पर्यंतचे वर्ग सुरू झाल्यामुळे शाळेतील शिक्षकांची उपस्थिती व अध्यापन कार्याची वेळ ठरवून द्यावी या मागण्या करण्यात आल्या. दरम्यान, स्वाध्याय उपक्रमावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी चंद्रपूर जिल्हा मुख्याध्यापक असोशिएशनचे अध्यक्ष नरेंद्र बोबडे, कार्याध्यक्ष रमेशराव पायपरे, सचिव राजू साखरकर यांच्यासह कोषाध्यक्ष छाया मोहितकर, सदस्य अनिता पंधरे, विकास वाकडे, तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अध्यक्ष दिवाकर पुद्दटवार, प्रजासत्ताक संघटनेचे हेमराज नदेश्वर तसेच शिक्षकेत्तर संघटनेचे सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.