शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
2
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
3
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
4
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
5
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
6
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
7
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
8
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
9
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
10
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
11
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
12
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
13
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
14
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
15
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
16
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
17
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
18
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
19
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
20
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

By admin | Published: January 28, 2017 1:03 AM

भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ६८ वा वर्धापन दिन जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालय,

चंद्रपूर : भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ६८ वा वर्धापन दिन जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालय, संस्थांमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. प्रजासत्ताक दिनाच्या निमीत्त्याने विविध रंगारंग कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन उपस्थितांची मने जिंकली.पोलीस अधीक्षक कार्यालयचंद्रपूर : भारतीय प्रजासत्ताक दिनानिमीत्त पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या प्रांगणात सकाळी ८ वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक संदिप दिवाण यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. कार्यक्रमाला अपर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत, पोलीस उपअधीक्षक (गृह) जयचंद्र काठे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक तसेच सर्व शाखांमधील पोलीस अधिकारी, कर्मचारी, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचारी व चंद्रपुरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. श्री महर्षी विद्यामंदिर, चंद्रपूरचंद्रपूर : श्री महर्षी विद्या मंदिर येथे प्रा. राजुरकर, बहादे, गुरुकुल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गिरीश चांडक, उपाध्यक्ष वसुधाताई कंचर्लावार, सचिव दत्तात्रय कंचर्लावार, कोषाध्यक्ष अनुपम चिलके, सदस्य उमेश चांडक, विरेंद्र जयस्वाल, अलका चांडक तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीलक्ष्मी मूर्ती आणि उपमुख्याध्यापिका निशा मेहता उपस्थित होत्या. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. महात्मा गांधी विद्यालयगडचांदूर : महात्मा गांधी विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय तथा विज्ञान महाविद्यालय, विद्यामंदिर, स्कालर्स सर्च अ‍ॅकेडमी येथे मुख्य ध्वजारोहन संस्थापक अध्यक्ष माजी आ. अ‍ॅड. विठ्ठलराव धोटे यांच्या हस्ते झाले. आर.एस.पी. व स्काऊट गाईडचे ध्वजारोहन प्राचार्य गिरीधर बोबडे यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सहसचिव धनंजय गोरे, प्रतिभा धोटे, प्राचार्य डॉ. अनिस खान, मुख्याध्यापिका रश्मी भालेराव, उपमुख्याध्यापक रमेश पाटील, उपप्राचार्य शरद जोगी, पर्यवेक्षक कृष्णा बत्तुलवार, प्रशांत उपलंचवार, विलास बोढे होते. याप्रसंगी आर.एस.पी. व स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी पथसंचलन करून मानवंदना दिली. संचालन तथा आभार विलास बोढे यांनी केले.म्यूझीक डॉन्स अकॉडमी, ब्रह्मपुरीब्रह्मपुरी : सांझ विहार कल्चरल म्यूझिक डॉन्स अ‍ॅकडमी ब्रह्मपुरी तर्फे देशभक्तीपर ‘ए वतन तेरे लिये’ या सांस्कृतीक गित व नृत्याचे आयोजन येथील पंचशील एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात करण्यात आले होते. कार्यक्रमाला गायक मुकेश कुमार, प्रिया चंद्रपूरकर, अमर छिशल, निवेदक मकसुद खान तर संगीत संयोजक जगदिश गोलीला यांची उपस्थिती होती.सोमय्या पॉलिटेक्नीक कॉलेज चंद्रपूर : सोमय्या पॉलिटेक्निक वडगाव चंद्रपूर येथे प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष पी.एस. आंबटकर, सेवानिवृत्त एस.एस. आंबटकर तसेच सोमय्या पॉलिटेक्निकचे को-आॅरडीनेटर प्रा. श्रीकांत गोजे, उपप्राचार्य एच.एन. गंडाटे, प्रा. निमकर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात देशभक्तीपर गीत आणि समुह नृत्याने करण्यात आली. कार्यक्रमाकरिता विभाग प्रमुख प्रा. ए.एच खान, प्रा. डी.वी. मस्के, प्रा. ए.आर. खुजे, प्रा. एम.झेड. शेख, रजिस्टार राजेश बिसेन तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. संचालन समीर खान व नौशाद सिद्दीकी यांनी केले. आभार करण सिंग राजपुत या विद्यार्थ्याने मानले.प्रभादेवी स्कुल आॅफ नर्सिंगचंद्रपूर : प्रभादेवी स्कुल आॅफ नर्सिंग चंद्रपूर येथे विविध कार्यक्रम पार पडले. यावेळी संस्था अध्यक्ष अविनाश खैरे, निना खैरे यांची प्रमुख उपस्थिती होती. भावगीत, देशभक्तीपर गीत, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या कार्यक्रमाला प्राचार्य अब्दुल वसिम शेख, लाहकरे, सौरभ कठाणे, श्वेता ढुमणे, वर्षा कोंडागुर्ले, प्रियंका शर्मा, संस्थेचे सल्लागार सचिन मानकर, शेखर वाकडे, सुभाष नगराळे, किरण वैरागडे, शारदा वैरागडे उपस्थित होते. मृणाली पात्रीकर या विद्यार्थिनीने आभार मानले. वैभव कॉन्व्हेंट बल्लारपूरबल्लारपूर : स्थानिक वैभव कॉन्व्हेंटचे ध्वजारोहन श्रीनिवास सुंचूरवार याच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शबिस्ता सिराज सय्यद तर प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष हरिष शर्मा, तसेच शाळेतील शिक्षक उपस्थित होते. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन अभय गौर यांनी केले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.न्यू विद्याश्री पब्लिक स्कूलबल्लारपूर : स्थानिक न्यू विद्याश्री पब्लिक स्कूलचे ध्वजारोहन रजनी हजारे यांच्या हस्ते झाले. यावेळी भास्कर माकोडे, राजू झोडे, करिम भाई, हेमंत मान रजिया खान आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचलन सुखदीप बहुरिया यांनी तर आभार सुचिता वाघमारे यांनी मानले. जि.प.प्राथमिक शाळा लालडोहगडचांदूर : जि.प.प्राथमिक शाळा लालडोह येथील ध्वजारोहन मुख्याध्यापक व्ही.एन.राठोड यांच्या हस्ते करण्यात आले.(लोकमत चमू)