चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी रामदास पाटील यांंची महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश चुनारकर यांच्या नेतृत्त्वाखाली शिष्टमंडळाने भेट घेऊन प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित समस्या, मागण्यांंबाबत निवेदन दिले. शिष्टमंंडळात राजू लांजेकर, संजय पडोळे, संतोष बोडखे, सुरेश गिलोरकर, बंंडू लाकडे, शैलेश पोडल्लीवार यांचा समावेश होता.प्राथमिक शिक्षकांंच्या प्रलंंबित समस्यात प्रामुख्याने प्राथमिक शिक्षकांचे मासिक पगार तात्काळ करणे, सेवाज्येष्ठ शिक्षकांचे स्थायी आदेशात गाळलेली नावे समाविष्ट करणे, इयत्ता ६ वी ते ८ वीला शिकविणाऱ्या शिक्षकांच्या शैक्षणिक व व्यावसायिक अहतेबाबत, शैक्षणिक वेळापत्रकाबाबत, शिक्षक व क्रीडा समितीमधील निमंत्रित प्रतिनिधी म्हणून शिक्षणतज्ञ संबंधात प्रस्ताव मागविण्याबाबत व क्रीडा सम्मेलनात दंडाच्या रकमेच्या कारवाहीबाबत, बिंदू नियमावली मान्यतेबाबत, निवडश्रेणी प्रशिक्षणाबाबत , ६ वे वेतनन आयोग हप्ते जमा होणेबाबत, शालेय गणवेशाबाबत, बी.एड. परवानगी, सेवानिवृत्त प्रकरणे तात्काळ मंजूर करणे, शालेय पोषण आहार आदी समस्यांंचा समावेश होता.प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित समस्या मागण्या रामदास पाटील शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या कार्यकाळात निकालात निघण्याच्या दृष्टीने वेग येईल. असा विश्वास राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेने व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)
प्राथमिक शिक्षक परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन
By admin | Published: June 19, 2014 11:47 PM