लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : वंश, धर्म, जातीच्या नावावर अतिरेक करुन केवळ विचार पटत नाही म्हणून होणारे खून हे मानवतेला न शोभणारी बाब आहे. अशी असंहिष्णूता लोकशाहीला मारक आहे. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नसून कर्तव्य व अधिकार यांची योग्य जाणीव ठेवून कर्मकांड, अंधश्रद्धा, व्यसनाधिनता यांचे समुळ उच्चांटन करणे आवश्यक आहे. स्वातंत्र्य हे जीवनातील अमुल्य मूल्य असल्याचे भान सर्वांनी ठेवणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्यां व सर्चच्या संचालिका डॉ. राणी बंग यांनी केले.राजुरा मुक्ती दिन उत्सव समितीद्वारे हैद्राबाद मुक्ती संग्राम दिनानिमित्त आयोजित राजुरा मुक्ती दिन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अर्थतज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले होते. उद्घाटन जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांच्या हस्ते झाले. यावेळी सत्कारमूर्ती म्हणून न्यायमूर्ती मुर्लीधर गिरडकर, प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार अॅड. वामनराव चटप, सुभाष धोटे, सुदर्शन निमकर, उपविभागीय अधिकारी डॉ. राजा दयानिधी, उपविभागीय पोलीस अधिकारी शेखर देशमुख, तहसीलदार डॉ. होळी, पं.स. सभापती कुंदा जेनेकर, न. प. उपाध्यक्ष सुनील देशपांडे, स्वामी येरोलवार, रमेश नळे, अॅड. अरुण धोटे, डॉ. सुरेश उपगन्लावार, डॉ. उमाकांत धोटे, प्राचार्य वारकड, प्राचार्य भोंगळे, प्राचार्य ठाकूरवार आदी उपस्थित होते.कार्यक्रमात राजुरा क्षेत्रातील मुळ रहिवासी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्या. मुर्लीधर गिरडकर, उपवनसंरक्षक सतिश वडस्कर, सिकॉमचे सेवानिवृत्त व्यवस्थापकीय संचालक जागोबा साळवे, वासुदेव सोमलकर, संघमित्रा बांबोळे व संमु चौधरी यांचा गुणगौरव सत्कार करण्यात आला.
कर्मकांड, व्यसनाधीनता, अंधश्रद्धा यांचे समूळ उच्चाटन आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 12:13 AM
वंश, धर्म, जातीच्या नावावर अतिरेक करुन केवळ विचार पटत नाही म्हणून होणारे खून हे मानवतेला न शोभणारी बाब आहे. अशी असंहिष्णूता लोकशाहीला मारक आहे.
ठळक मुद्देराणी बंग यांचे प्रतिपादन : राजुरा मुक्ती संग्राम दिन कार्यक्रम