शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

आरक्षणावरुन गावकरी संभ्रमात

By admin | Published: April 04, 2015 12:24 AM

सदस्य आणि सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आल्यानंतर नागभीड तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे.

नागभीड तालुका : सरपंचपदाची सोडतनागभीड : सदस्य आणि सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आल्यानंतर नागभीड तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. असे असले तरी काही गावात आरक्षणावरुन गोंधळ निर्माण झाल्याने गावकरीही संभ्रमात सापडले आहेत.संभ्रमाची ही स्थिती तालुक्यातील मौशी, कोर्धा आणि भिकेश्वर या गावात निर्माण झाली आहे. या गावातील सरपंचपद हे अनु. जमातीकरिता राखीव करण्यात आले आहे. मौशी, कोर्धा येथील अनु. जमाती सर्वसाधारण तर भिकेश्वर येथील सरपंचपद याच प्रवर्गातील महिलेकरिता आरक्षीत आहे. पण आश्चर्याची गोष्ट अशी की, या प्रवर्गातील सदस्यांचे पद या गावात आरक्षित करण्यात आले नाही.या गावात अनु. जमाती प्रवर्गाची लोकसंख्या काही प्रमाणात आहे. हे जरी खरे असले तरी बाकी लोकसंख्येच्या तुलनेत त्यांची संख्या कमी प्रमाणात आहे. त्यामुळेच या गावात सदस्यपदाचे आरक्षण ठेवण्यात आले नसावे, असे यासंदर्भात बोलल्या जात आहे. ज्या गावात या प्रवर्गाची संख्या भरपूर आहे व सदस्य पदाच्या आरक्षणातही या प्रवर्गाला स्थान मिळाले आहे, अशाच गावात सरपंच पदाचे आरक्षण ठेवायला पाहिजे होते. जेणेकरुन या प्रवर्गाला खऱ्या अर्थाने प्रतिनिधीत्व करता आले असते. आता या गावात या प्रवर्गातील व्यक्ती खुल्या प्रवर्गातून निवडून आले तर ठिक, नाही तर सारेच मुसळ केरात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे गावकऱ्यांत संभ्रम निर्माण झाला असून प्रशासनाने संभ्रम दूर करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.दरम्यान सदर प्रतिनिधीने तहसीलदार श्रीराम मुंदडा यांच्याशी संपर्क साधला असता, संपर्क होऊ शकला नाही. (तालुका प्रतिनिधी)ही प्रशासनाची चुक आहे. निवडणुकीच्या आधी ती दुरुस्त करण्यात यावी. जिल्हा प्रशासनानेही यात पुढाकार घ्यावा.- संजय गजपुरे, नागभीड