लोकमत न्यूज नेटवर्कसिंदेवाही : राज्यात १ ते ३१ जुलै या कालवधीत १३ कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. त्यादृष्टीकोणातून तालुक्याला १ लाख ३० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार वनविभागातर्फे तयारी करण्यात येत असून खड्डे खोदण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी संपूर्ण महाराष्ट्र हिरवागार करण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार यावर्षी १३ कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. या वृक्ष लागवड अभियानात सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यासोबत खासगी संस्था वृक्षारोपण करणार आहेत. त्यामध्ये सिंदेवाही नगर पंचायत १० हजार, वनविभाग १६ हजार, समाजिक वनिकरण २० हजार, पंचायत समिती १० हजार, तालुक्यातील इतर ग्रामपंचायत ३० हजार, कृषी उत्पन्न बाजार समिती दोन हजार, तहसील कार्यालय पाच हजार यांच्यासह विविध सामाजिक संघटना एकूण एक लाख ३० हजारांच्यावर वृक्षारोपण करण्याचा संकल्प केला आहे. वृक्षलागवडीसंदर्भात मागील वर्षीचा अनुभव लक्षात घेता सिंदेवाही वनविभागातर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामुळे वृक्षलागवडीसंदर्भात जनजागृती करण्यासंदर्भात शासकीय कार्यालयामार्फत बैठकी घेण्यात येत आहेत. विशेष म्हणजे यावर्षी वृक्षारोपणाचे कॅमेराद्वारे चित्रीकरण करण्यात येणार आहे. एकंदरीत वनविभागामार्फत वृक्षलागवडीची जय्यत तयारी करण्यात येत आहे.बल्लारपूर नगरपालिका लावणार २० हजार वृक्षबल्लारपूर : राज्यातील १३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत बल्लारपूर शहरात नगर परिषदेकडून २० हजार झाडे लावली जाणार आहेत. यामध्ये नुतन बालकाचे आगमनाप्रित्यर्थ जन्मवृक्ष, नवविवाहित वधूवरांना शुभ आशीर्वाद म्हणून शुभमंगल वृक्ष, दहावी, बारावी आणि इतर परीक्षा उत्तीर्ण होणाºया तसेच नुकतीच नोकरी लागलेल्या तरुण तरुणींच्या हस्ते आनंद वृक्ष, घरातील निधन झालेल्या व्यक्तींच्या आठवणीत स्मृती वृक्ष तसेच घरगुती वृक्ष याप्रकारे शहराच्या विविध भागात वृक्ष लागवड करण्यात येणार आहेत. वृक्ष लागवडीनंतर त्या वृक्षांच्या संवर्धनाची जबाबदारीसुद्धा संबंधित व्यक्तींना घ्यावी लागणार आहे. विशेष म्हणजे बल्लारपूर नगर परिषदेने दिवंगत नगराध्यक्षाच्या स्मृतीत प्रत्येकी पाच झाडे लावून त्यांचे संवर्धन करण्याचा संकल्प केला आहे. सदर वृक्ष लागवडीमध्ये रोडच्या दोन्ही बाजूंना पाच हजार वृक्ष तर खुल्या मैदानावर १५ हजार वृक्ष लावण्यात येणार आहे. वृक्षलगवडीच्या योजनेसाठी नगराध्यक्ष हरिश शर्मा, उपाध्यक्ष मीना चौधरी, मुख्याधिकारी विपीन मुद्दा तसेच नगरपालिकेचे सर्व नगरसेवक प्रयत्नरत आहेत.
सिंदेवाही तालुक्यात एक लाख वृक्ष लागवडीचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 11:03 PM
राज्यात १ ते ३१ जुलै या कालवधीत १३ कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. त्यादृष्टीकोणातून तालुक्याला १ लाख ३० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार वनविभागातर्फे तयारी करण्यात येत असून खड्डे खोदण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.
ठळक मुद्देवनविभागातर्फे जय्यत तयारी : खड्डे खोदण्याच्या कामाला सुरुवात