लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : माता-भगिनींचा सन्मान हा भारतीय संस्कृती आणि परंपरेचा अविभाज्य भाग आहे. या चिरंतन संस्कृतीचे जतन करीत स्त्री जातीचा सन्मान राखावा, असे प्रतिपादन महापौर अंजली घोटेकर यांनी केले. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या पुढाकारातून नेहरूनगरात घेण्यात आलेल्या हळदीकुंकू व महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या.भाजपा महिला आघाडीने शहरातील एकोरी वार्ड, जलनगर वार्ड व अन्य प्रभागातही हा कार्यक्रम घेतला. यावेळी भाजपा प्रदेश महिला आघाडीच्या उपाध्यक्ष वनिता कानडे, भाजपा जिल्हा महासचिव राहुल सराफ, मोहन चैधरी, नगरसेवक अॅड. राहुल घोटेकर, अंकुश सावसाकडे, रवी आसवानी, राजु येले व अन्य उपस्थित होते. महापौर घोटेकर म्हणाल्या, महिलांच्या हितासाठी सरकारने अनेक कायदे केले. राज्य सरकारकडून काटेकोर अंमलबजावणी सुरू केल्याने अत्याचाराच्या घटनांमध्ये घट झाली आहे. महिलांचे सक्षमीकरण, रोजगार, स्वयंरोजगार, महिलांचे ऐक्य व न्याय न्यायासह विविध क्षेत्रात पुरूषांच्या बरोबरीने संधी मिळत आहे.सभापती माया उईके, नगरसेविका वनिता डुकरे, शितल गुरनुले, रत्नमाला वायकर, शिला चव्हाण, उषा उराडे, सविता कांबळे, चंद्र्रकला सोयाम, वंदना जांभुळकर, अनुराधा हजारे, प्रभा गुडधे, घोडेस्वार, शुभांगी दिकोंडवार, उमाखोलापुरे, सुनिता कागदेलवार, मनिषा महातव, प्रिया नांदे, स्मिता नंदनवार आदींची उपस्थिती होती. हळदीकुंकू लावून महिलांना भेटवस्तु वितरण करण्यात आले.
महिलांचा आदर करा- घोटेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 10:57 PM