सिंदेवाही : आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान व प्रेरणास्थान असलेले क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांचा चंद्रपुरातील पुतळा महानगरपालिका प्रशासनाने हटविला. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात समस्त आदिवासी समाजात तीव्र असंतोष निर्माण झालेला आहे. सदर पुतळा पूर्ववत विराजमान करा, अशी मागणी सिंदेवाही येथील समाजबांधवांनी केली आहे. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद सिंदेवाही शाखेच्या वतीने सदर घटनेचा निषेध करण्यात आला. क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांचा पुतळा नियोजित त्याच जागेवर पूर्ववत मनपा प्रशासनाने बसवावा. ही मागणी सिंदेवाही विकास परिषदेचे तालुकाध्यक्ष विजय सोयाम यांनी केली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदिवासी विकासमंत्री के.सी. पाडवी,पालकमंत्री विजय वडेट्टीवार, आयुक्त मनपा चंद्रपूर यांना यासंदर्भात निवेदन पाठविले आहे. यावेळी कैलास कुंभरे, मधुकर पेंदाम, लोकेश मडावी, वसंत सिडाम, राजाभाऊ मेश्राम उपस्थित होते.
बिरसा मुंडा यांचा पुतळा पूर्ववत विराजमान करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2021 4:27 AM