लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा: नागरी येथे पॉवर ग्रीडच्या वतीने वीज उपकेंद्राची उभारणी सुरू आहे. यासाठी शेतकºयांकडून जमीन ताब्यात घेण्यापूर्वी करारनामा करणे गरजेचे होते. मात्र काही शेतकºयांशी केलेला करार बाजूला ठेवून संबंधित अधिकाºयांनी थेट बांधकाम सुरू केल्याने शेतकºयांनी शनिवारी मज्जाव केल्याची घटना घडली. करारनामानुसार मोबदला मिळाला नाही तर बांधकाम कायस्वरुपी बंद करून पॉवर ग्रीड कर्पोरेशनच्या अधिकाºयांना धडा शिकवू, असा इशाराही शेतकºयांनी दिला आहे.वर्धा ते नागरी ४०० केवी विज तारा टाकण्याचे काम पावर ग्रीडने सुरू केले. याशिवाय नागरी ते परडी पर्यंतही वीजतारा टाकण्यात येणार आहे. वरोरा, चिमूर तसेच वर्धा जिल्ह्यातील शेतकºयांचे या टॉवरमुळे नुकसान होणार आहे. टॉवरची उभारणी शेतात केली जात असून शेतकºयांनी विरोध केल्यास पोलिसांच्या माध्यमाने बळाचा वापर केला जातो. हा प्रकार मागील काही दिवसापासून सुरू असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. या संदर्भात शेतकºयांनी वरिष्ठ अधिकाºयांशी संपर्क साधला. मात्र कुणीही दखल घ्यायला तयार नाही. वर्धा ते नागरी या मार्गावर टॉवर लाईन उभारताना शेतकºयांची बाजू समजून घेण्यात आली नाही. शिवाय, मोबदला दण्याबाबत कोणताही तोडगा काढला नाही. परंतु टॉवर उभारणीचे काम सुरू करून शेतकºयांवर अन्याय केला जात आहे. दरम्यान आज शेतकºयांनी घटना स्थळावर जाऊन अधिकाºयांना धारेवर धरले आणि टॉवर उभारणीचे काम बंद केले आहे. आर्थिक मोबदल्याचा कारनामा न करताना नियमांचे उल्लंघन करून मनमानी करणे नाही. यातून पून्हा असंतोष पसरू शकतो. त्यामुळे सामंज्यशाने चर्चा करून अन्याय दूर करावी, अशी मागणी शेतकºयांनी निवेदनातून केलीे आहे.अन्यायग्रस्त शेतकºयांची सोमवारी बैठकअन्यायग्रस्त शेतकºयांनी टॉवर उभारणीला विरोध दर्शवल्याने सोमवारी सकाळी ११ वाजता उपविभागीय कार्यालयात पॉवर ग्रीडचे अधिकारी, कृषी भूमीअभिलेख विभागाचे अधिकारी आणि शेतकºयांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला शेतकºयांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार बाळू धानोरकर यांनी केली आहे.पोलीस बळाचा वापर करू नकाशेतकºयांनी विकासाला कधीही विरोध केला नाही. मात्र त्यांच्यावर अन्याय करून चुकीची धोरणे पुढे रेटणे बंद करावी, अशी मागणी शेतकºयांनी केली. करारनामा करण्यापूर्वी शेतात काम सुरू झाल्याने शेतकºयांनी जाब विचारला. दरम्यान पण, बाजू ऐकून न घेता काही अधिकारी पोलिसी बळाचा धाक दाखवतात, असा आरोप शेतकºयांनी केला आहे.
टॉवर उभारणीस शेतकºयांचा मज्जाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 11:51 PM
नागरी येथे पॉवर ग्रीडच्या वतीने वीज उपकेंद्राची उभारणी सुरू आहे. यासाठी शेतकºयांकडून जमीन ताब्यात घेण्यापूर्वी करारनामा करणे गरजेचे होते.
ठळक मुद्देशेतीचे नुकसान : पॉवर ग्रीडच्या अधिकाºयांना साकडे