शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
2
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
3
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
5
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
6
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
7
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
8
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
9
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
10
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
11
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
12
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
13
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
14
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 
15
मी मोदी सरकारसोबत उभी ठाकणार; ममता बॅनर्जींचे भर विधानसभेत मोठे वक्तव्य 
16
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ
17
बांगलादेशात अटक करण्यात आलेल्या चिन्मय प्रभूंशी इस्कॉनने संबंध तोडले; कोणत्याही कामासाठी जबाबदार नसल्याचे सांगितले
18
१५ हजार एकर जमीन, हजारो कोटी रुपये किंमत, पण वारस नाही, या राजघराण्याची मालमत्ता सरकारने घेतली ताब्यात
19
बांगलादेशातील इस्कॉनला मिळाला मोठा दिलासा! उच्च न्यायालयाने बंदी घालण्यास दिला नकार
20
'प्यार का पंचनामा' फेम लोकप्रिय अभिनेत्री झाली आई, लग्नानंतर दीड वर्षांनी आयुष्यात आली छोटी पाहुणी

कोरोना रुग्णांच्या थेट भरतीवर येणार निर्बंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2021 4:22 AM

चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे जो तो रुग्णालयात बेड मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. ...

चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे जो तो रुग्णालयात बेड मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र प्रत्येकाला बेड मिळणे कठीण झाले आहे. त्यातच वशिलेबाजी करून काहीजण बेड मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत; त्यामुळे गरीब तसेच गरजू रुग्णांची हेळसांड होत आहे. यावर तोडगा म्हणून जिल्हा प्रशासनाने कोविड-१९ पेशंट मॅनेजमेंट पोर्टल कार्यान्वित केले आहे. या माध्यमातून रुग्णांची नोंदणी तसेच गरजू रुग्णांना आवश्यकतेनुसार शासकीय तसेच खासगी रुग्णालयात बेड मिळवून देत उपचार केले जाणार आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांची होणारी फरफट थांबणार असून रुग्णांनाही आवश्यकता आणि गरजेनुसार उपचार केले जाणार आहे.

रुग्ण जवळच्या कोरोना केअर सेंटर किंवा कोविड रुग्णालयात गेल्यावर तिथे रुग्णांची ऑक्सिजन लेव्हल व इतर बाबींची तपासणी केली जाणार आहे. रुग्णांची नोंदणी पोर्टलवर अपलोड केली जाणार आहे. रुग्णांची गंभीर स्थिती पाहून केंद्रीय प्रवेश पद्धतीनुसार रुग्णाला चंद्रपूर शहरातील आवश्यक सुविधायुक्त हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्धतेनुसार वेळीच उपचार केले जाणार आहे. गरज नसलेल्या रुग्णांना आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून घरीच औषधोपचार केले जाणार आहे.

या पोर्टलच्या माध्यमातून रुग्णांना चंद्रपूर शहरातील सर्व कोविड रुग्णालयात आय. सी. यू., व्हेंटिलेशन व ऑक्सिजन बेडच्या तीन स्वतंत्र प्रतीक्षा यादीनुसार बेड उपलब्ध करून दिले जाणार आहे.

बाॅक्स

रुग्णांना परस्पर दाखल झाले कठीण

रविवारपासून शहरातील कोविड रुग्णालयांना रुग्णांना परस्पर दाखल करता येणार नसून प्रथम रुग्णालयातील उपलब्ध रिक्त बेडची माहिती जिल्हा नियंत्रण कक्ष व कोविड केअर सेंटरला द्यावी लागणार आहे. बेड रिक्त झाल्यावर संबंधित रुग्णालय तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष रुग्णाला माहिती देणार आहे. या प्रणालीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेल्या हॉस्पिटलमध्ये रुग्ण थेट जाऊन उपचार घेऊ शकणार आहे. यामुळे प्रतीक्षा यादीतील गरजू रुग्णांना तत्काळ बेड उपलब्ध होणार आहे. बेड उपलब्ध झाल्यामुळे रुग्णांची हेळसांड काही प्रमाणात का होईना, थांबणार आहे.

बाॅक्स

खोटे बोलणे रुग्णालय प्रशासनाच्या येणार अंगलट

शहरातील काही कोविड रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध असतानाही रुग्णांना उपलब्ध करून दिले जात नाहीत. अनेक वेळा फी भरल्याशिवाय बेड दिलेच जात नाहीत. त्यामुळे आता अशा रुग्णालयांवरही निर्बंध आले आहेत. रुग्णालयातील रिक्त जागेबाबत त्यांना प्रथम जिल्हा नियंत्रण कक्ष व कोविड केअर सेंटरला माहिती द्यावी लागणार आहे. या केंद्रातून येणाऱ्याच रुग्णाला दाखल करून घ्यावे लागणार आहे.

बाॅक्स

रेमडेसिविर इंजेक्शनची माहितीही द्यावी लागणार

या पोर्टलमध्ये रुग्णालयाला दिल्या जाणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनची माहितीसुद्धा उपलब्ध राहणार आहे. पोर्टलच्या पहिल्या पानावर कोविड हॉस्पिटल, डॉक्टर व त्यांच्या नोडल अधिकाऱ्यांची माहिती व मोबाईल क्रमांक देण्यात येणार आहे.

बाॅक्स

पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

रुग्णांना सुविधा होणाऱ्या या पोर्टलचे उद्घाटन पालकमंत्री वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरनुले, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, महापालिका आयुक्त राजेश मोहिते, उपविभागीय अधिकारी रोहन घुगे, अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड उपस्थित होते.

बाॅक्स

अशी होणार नोंदणी

प्रत्येक रुग्णाला त्याच्या आवश्यकतेप्रमाणे रुग्णालय व बेड उपलब्ध होणार आहे. नोंदणी करताना रुग्णाचा आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजन पातळी, आरटीपीसीआर तपासणी अहवाल आवश्यक आहे. तसेच नोंदणी करताना एका मोबाईल क्रमांकावरून चार रुग्णांची नोंदणी करता येऊ शकणार आहे. मोबाईल नसल्यास त्यांना इतरांच्या मोबाईलवरूनदेखील नोंदणी करता येणे शक्य होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिली. सदर पोर्टल कार्यान्वित करण्यासाठी नागपूर येथील लॉज त्रिमूर्ती या संस्थेचे सहकार्य लाभले आहे.