उत्पादन वाढीसाठी नवनवीन प्रयत्न : शेणखताचा वापर करण्याचे आवाहनचंद्रपूर : पिकावरील रोगराईचा नाश व भरघोस उत्पादन घेण्याच्या उमेदीने जिल्ह्यातील शेतकरी विविध प्रकारच्या किटकनाशकाचा वापर मोठ्या प्रमाणात करीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतजमीन व पिकांवर त्याचा परिणाम होत असून शेतकऱ्यांना अपेक्षेपेक्षा कमी उत्पादन मिळत आहे. शेतकऱ्यांनी प्रमाणात औषधांचा वापर करावा. तसेच पीक पद्धतीत बदल करावा, अशी चर्चा प्रगतीशील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.अनेक शेतकरी शेतीत आधुनिक पद्धतीचा वापर केला तर याचा फायदा मिळेल. मात्र या आधुनिक शेतीच्या नादात शेतात अक्षरश: विषाची फवारणी केली जात आहे. त्यामुळे शेतजमिनीची सुपिकता गमावून शेती धोक्यात येत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात हा प्रकार मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. अधिकाधिक उत्पन्न देणाऱ्या बियाण्यांची मागणी वाढत गेल्याने बियाण्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. नवनवीन वाण बाजारात उपलब्ध असून यासोबतच किटकनाशकांचीही मागणी वाढली आहे. शेतात उत्पादन होणाऱ्या धानपीक, भाजीपाला आदी पिकांवर विभागाकडून व्यक्त केले जात आहे.जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानपिकांचे उत्पादन घेतले जात आहे. मात्र वर्षोनुवर्षे आजोबा- पंजोबामधून कसत असलेल्या जमिनीची परंपरा आजही जिल्ह्यातील काही भागांमध्ये दिसून येत आहे. भरघोस उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पीक घेण्याच्या पद्धतीत बदल करावा, असेही मत व्यक्त केले जात आहे. आधुनिक शेतीमधील किटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनीचा कस कमी झाला आहे. भरघोष उत्पादन घेण्यासाठी दरवर्षी पीक घेण्याच्या पद्धतीत बदल करावा, सोबतच किडीवर फवारणी प्रमाणात करावी, असेही मत सुज्ञ शेतकऱ्यांकडून व्यक्त केले जात आहे. रासायनिक खतामुळे मानवी जीवनावर दुष्पपरिणाम होत असल्याचे लक्षात घेत पोत सुधारण्यासाठी शेणखत व कंपोस्ट खताचा वापर करावा, असे आवाहन केले आहे. (शहर प्रतिनिधी)
रासायनिक व विषारी फवारणीमुळे रबी पिकांवर परिणाम
By admin | Published: February 10, 2017 12:57 AM