चंद्रपूर : भारतीय ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ, चंद्रपूर द्वारा संचालित भवानजीभाई चव्हाण हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, चंद्रपूर येथे सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून निरोप देण्यात आला.
याप्रसंगी अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष चुन्नीलाल चव्हाण, प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. वामनराव लोहे, सचिव केशवराव जेनेकर, सहसचिव लक्ष्मणराव धोबे, प्राचार्य सी. डी. तंन्नीरवार, उपप्राचार्य सी. बी. टोंगे सर, पर्यवेक्षक सहारे, राऊत, विधाते उपस्थित होते. प्राचार्य सी. डी. तंन्नीरवार यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. मुख्याधापक पदावर कार्यरत असणारे आर. जी. बनकर, पर्यवेक्षक महादेवराव ढुमने, पर्यवेक्षिका पी. पी. पिट्टलवार, सहाय्यक शिक्षक एस. एम. चोपणे, संगीत शिक्षक आर. डी. कासलीकर, सहाय्यक शिक्षिका एल. एम. चिमुरकर, प्रयोगशाळा सहाय्यक ए. एन. कोसारकर, शिपाई पी. एस. गेडाम असे आठ कर्मचारी सेवानिवृत्त झाले. मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन परिवारासह त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या सेवाकाळातील कार्याविषयी प्रा. मोहन जेणेकर आणि पर्यवेक्षिका सहारे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सत्कारमूर्तींनी आपल्या शाळेतील आठवणींना उजाळा दिला. याप्रसंगी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन निले यांनी केले. आवारी यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जे. एम. टोंगे, डी. एल. कुरेकर, पी. डब्ल्यू. उरकुडे यांनी सहकार्य केले.