लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार वादळी पाऊस आहे. या पावसामुळे कापूस, सोयाबीन, धान या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अशातच रविवारी सायंकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा परतीच्या पावसाने हजेरी लावली. पुन्हा पिकांना फटका बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारने या नुकसानीची नोंद घ्यावी, अशी मागणी या सर्व गावातील शेतकऱ्यांनी केली आहे.सध्या सोयाबीन पिकाची कापणी सर्वत्र सुरू असून कापल्यानंतर वाळण्यासाठी हे पीक शेतात ठेवले जाते. नंतर एकत्र करून त्याचा ढीग तयार करण्यात येतो. हे सर्व सुरू असतानाच ८ ऑक्टोबरपासून वादळासह जोरदार पावसाच्या सरी येत आहेत. शनिवारीला रात्री जोरदार विजगर्जनेसह वादळी पाऊस आला. या पावसामुळे बऱ्याच गावातील शेतकऱ्यांच्या कापूस, सोयाबीन व धान पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.दरम्यान, रविवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास जिल्ह्यात पुन्हा परतीच्या पावसाने हजेरी लावली. यामुळे सोयाबीन, धान व कापूस पिकाला जोरदार फटका बसला. धान तर शेतातच भूईसपाट झाले. चंद्रपूरसह, राजुरा, कोरपना, सिंदेवाही, मूल, भद्रावती, वरोरा आदी तालुक्यातही हा पाऊस झाला.राजुरा तालुक्यातील गोवरी, पोवनी, चिंचोली, बबापूर, साखरी, मानोली, वरोडा, गोयेगाव, अंतरगाव, आर्वी, वरुर रोड, टेंबुरवाही, तुलाना, बेरडी, सिर्सी, चिचबोडी, भेंडाळा, भुरकुंडा, भेदोडा, साखरवाही, पाचगाव, कापनगाव यासह अनेक गावात जोरदार पाऊस आला. त्यात कापूस, व व धान पिकाचे मोठे नुकसान झाले. धान पीक शेतात झोपून गेल्याचे दिसत आहे. सोयाबीन कापणी झाल्यानंतर पाऊस आल्याने शेतकºयांनी दुसऱ्या दिवशी वाळण्यासाठी ते परतवून ठेवले. मात्र त्यानंतर पुन्हा जोरदार पाऊस आल्याने आता या सोयाबीनला कोंब फुटून संपूर्ण पीक हातचे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.भरपाई द्यावीशेतकरी आधीच चिंतेत असताना आता परतीच्या पावसाने शेतकरी हवालदिल झाला आहे. आता शासनाने शेतकºयांच्या या नुकसानीची दखल घ्यावी आणि नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.
जिल्ह्याला परतीच्या पावसाने झोडपले खरीप पिकांचे पुन्हा मोठे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 5:00 AM
सध्या सोयाबीन पिकाची कापणी सर्वत्र सुरू असून कापल्यानंतर वाळण्यासाठी हे पीक शेतात ठेवले जाते. नंतर एकत्र करून त्याचा ढीग तयार करण्यात येतो. हे सर्व सुरू असतानाच ८ ऑक्टोबरपासून वादळासह जोरदार पावसाच्या सरी येत आहेत. शनिवारीला रात्री जोरदार विजगर्जनेसह वादळी पाऊस आला. या पावसामुळे बऱ्याच गावातील शेतकऱ्यांच्या कापूस, सोयाबीन व धान पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
ठळक मुद्देकापूस, सोयाबीन व धानालाही फटका : शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला