आयुष्य क्षणभंगूर आहे. मात्र आपला जवळच्या व्यक्तीचे प्राण वाचविण्यासाठी कुटुंबीय वाटेल ते करायला तयार होतात. गोंडपिपरी तालुका मागासलेला आहे. येथे आरोग्य सुविधा मुबलक प्रमाणात नाही. ग्रामीण भागातून गोंडपिपरी ग्रामीण रुग्णालयात रुग्णाला हलविले जाते. मात्र आणीबाणीचा प्रसंग असला की, रुग्णाला तत्काळ चंद्रपूरला रेफर केले जाते. अशाप्रसंगी कमी वेळात चंद्रपूर गाठण्याची मोठी जबाबदारी रुग्णवाहिका चालकाची असते. गोंडपिपरी ग्रामीण रूग्णालयातील नीलेश कुळमेथे या रुग्णवाहिकेच्या चालकाने आणीबाणीच्या प्रसंगी रूग्णांना कमी वेळात चंद्रपूरला पोहचविले. नीलेशमुळे अनेकांवर वेळेवर उपचार झाल्याने शेकडोंचे प्राण वाचले. मात्र नशीबाने नीलेशचा घात केला. एका अपघातात नीलेशच्या हाताला दुखापत झाली. त्यामुळे रोजगार गेला. आर्थिक संकटात नीलेश सापडला. वाढदिवस धूमधडाक्यात साजरा न करता चेतन सिंह गौर यांनी मदतीचा हात नीलेशला दिला. याप्रसंगी बबन निकोडे, नीलेश पुलगमकर, मनीष वासमवार, अश्विन कुसणाके,सुनील फुकट, नाना येल्लेवार, गणपती चौधरी, वैभव बोनगीरवार, प्रज्वल बोबाटे, पंकज चिलंकार उपस्थित होते. गौर यांनी केलेली मदत आयुष्यभर न विसरणारी आहे, अशी भावनिक प्रतिक्रिया नीलेश कुडमेथे यांनी दिली.
070921\img-20210906-wa0067.jpg
मदतीचा हात