लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : येथील अनिल मोतीलाल फाऊंडेशनच्या वतीने गुरुवारी मॅराथॉन व रिव्हर्स रनिंग (उलट दौड) स्पर्धेचे येथील कॉलरी मैदानावर आयोजन करण्यात आले. या स्पर्धेची विशेषत: अशी की रिव्हर्स रनिंग ही स्पर्धा इंडिया बुक आॅफ रेकार्डमध्ये नोंदविण्यात आली. यात एकूण ७७२ स्पर्धकांनी भाग घेतला. प्रथमच बल्लारपूर शहराचे नाव रिव्हर्स रनिंग (उलट दौड) च्या निमित्ताने इंडिया बुक आॅफ रेकार्डमध्ये नोंदविण्यात आले.१९ वर्षीय मॅराथॉन (मुले) स्पर्धेत संतोष करिकट्टा प्रथम, विवेक शर्मा द्वितीय, नीरज चव्हाण तृतीय तर ती किमी मुलींच्या स्पर्धेत रितू पेंदोर प्रथम, चेतना हजारे द्वितीय, प्रांजली गव्हारे तृतीय क्रमांक पटकाविला. रिव्हर्स रनिंग स्पर्धेत मुलांमध्ये सुमेध गडसे प्रथम, द्वितीय किशोर चिकाटे, तृतीय विवेक शर्मा तर मुलींमध्ये प्रथम ज्योत्सना डांगे, द्वितीय रागिनी आत्राम, तृतीय चेतना हजारे यांनी क्रमांक पटकाविला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष राहुल पुगलिया तर प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष हरिष शर्मा, पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कर, अॅथेलिक असोसिएशनचे डॉ.दिलीप जयस्वाल, इंडिया बुक आॅफ रेकार्डचे निरीक्षक निखिलेश सावरकर, सुनील मोतीलाल, चेतन गेडाम, मेघा भाले, गजानन गावंडे, नासीर खान, नाना बुंदेल, भास्कर माकोडे, भुरू भाई, नितीन पोहणे, देवेंद्र बेले, विजय कायरकर, लवली, मुन्ना ठाकुर, नाजीम खान, धीरज चव्हाण उपस्थित होते. विजेते स्पर्धकांना पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले.
रिव्हर्स रनिंगची इंडिया बुक आॅफ रेकार्डमध्ये नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 10:47 PM