ग्रामपंचायतीची करवसुली १०० टक्के करण्याबाबत व जलजीवन मिशन व १५ व्या वित्त आयोगांतर्गत प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर सर्व लोकांना नळाद्वारे पिण्याचे पाणी मिळण्याकरिता तत्काळ कामे करण्याचे निर्देश दिलेले आहेत.
आढावा सभेला पं. स. सभापती अल्का आत्राम, उपसभापती ज्योतीताई बुरांडे, पं. स. सदस्य विनोद देशमुख, पं. स. गंगाधर मडावी, गटविकास अधिकारी सुनीता मरस्कोल्हे, अधिकारी यांची उपस्थिती होती.
महाआवास अभियानांतर्गत ग्रामपंचायतीचे घरकुल, शौचालयाचे बांधकाम मुदतीमध्ये व उत्कृष्ट बांधकाम केलेले लाभार्थी गयाबाई मारोती टेकाम (रा. घनोटी तुकुम), राजू तुळशीराम लोनबले घोसरी, कमलबाई दसरू लेनगुरे, प्रकाश भाऊजी कोडापे (रा. केमारा), चंदू तुळशीराम सिडाम (रा. घनोटी तुकुम), विजय गणपती मरस्कोल्हे (रा. चेक आष्टा) यांचा सत्कार व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
संचालन भीमानंद मेश्राम यांनी केले तर प्रास्ताविक गटविकास अधिकारी सुनीता मरस्कोल्हे आणि आभार नीलेश भोयर यांनी मानले.