लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पळसगाव- आमडी उपसा सिंचन योजनेसाठी केलेला संघर्ष फळाला आला. या योजनेच्या माध्यमातुन १० गावांतील २ हजार ४६२ हेक्टर क्षेत्रात सिंचनाचा लाभ मिळणार आहे. यातून हरित क्रांती होणार, अशी ग्वाही अर्थ व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. सिंचन योजनेच्या बंद नलिका वितरण प्रणालीद्वारे सिंचन सुविधा पुरविण्याच्या कामाच्या भूमीपूजन कार्यक्रमाप्रसंगी सोमवारी जाहीर सभेत ते बोलत होते.यावेळी महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, भाजपा नेते प्रमोद कडू, जिल्हा परिषद सदस्य वैशाली बुध्दलवार, अॅड. हरीश गेडाम, बल्लारपूर तालुका भाजपाचे अध्यक्ष किशोर पंदिलवार, रमेश पिपरे, बल्लारपूर पंचायत समितीचे सभापती गोविंद पोडे, उपसभापती इंदिरा पिपरे, पंचायत समिती सदस्य सोमेश्वर पदमगिरीवार, विद्या गेडाम आदी उपस्थित होते.अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, या योजनेच्या माध्यमातुन पीक पध्दतीही बदलेल. शेतकऱ्यांना सेंद्रीय शेती, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शेती आदींबाबत मार्गदर्शन व प्रशिक्षणासाठी अजयपूर येथे पंजाब नॅशनल बँकेच्या सहकार्याने शेतकरी प्रशिक्षण केंद्र्र उभारल्या जात आहे. मुल तालुक्यात दुग्ध व्यवसाय वाढावा त्यामाध्यमातुन श्वेतक्रांती व्हावी, यादृष्टीने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी नमुद केले.पाईपलाईनसाठी २३ कोटी मंजूरचांदा ते बांदा या योजनेअंतर्गत चिचाळा व लगतच्या गावांमध्ये पाईपलाईनद्वारे सिंचनाची सुविधा उपलब्ध करण्यासाठी २३ कोटींचा निधी मंजूर केला. त्या कामालाही सुरूवात झाली आहे. माजी मालगुजारी तलावांच्या विशेष दुरूस्तींची कामे आपण पूर्णत्वास आणली आहे. हा मतदार संघ आरो युक्त मतदार संघ ठरावा यादृष्टीने आपण योजना आखली असून बल्लारपूर तालुक्यातही हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.सांसदीय कार्यावर ध्वनी चित्रफितउमरी पोतदार येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर केले आहे. कळमना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी निधीची अडचण दूर झाली. टाटा ट्रस्टच्या सहकार्याने ९२ गावांमध्ये सधन शेतकरी प्रकल्प आपण राबवित आहोत. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पळसगांव-आमडी उपसा सिंचन योजनेसाठी १९९६ पासून केलेल्या संसदीय संघर्षावर दृष्टिक्षेप टाकणाºया सिंचन संघर्ष या पुस्तिकेचे विमोचन चंदनसिंह चंदेल व अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यासंबंधीची ध्वनी चित्रफित दाखविण्यात आली.
दहा गावातील शेतीमध्ये येणार क्रांती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2019 11:09 PM
लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : पळसगाव- आमडी उपसा सिंचन योजनेसाठी केलेला संघर्ष फळाला आला. या योजनेच्या माध्यमातुन १० गावांतील ...
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : पळसगाव-आमडी सिंचन योजनेचे भूमिपूजन