शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
3
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
4
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
6
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
7
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
8
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
10
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
11
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
13
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
14
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
15
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
16
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
17
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
18
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
19
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
20
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले

तांदळाची तस्करी करणारे वाहन उलटले; चंद्रपूर जिल्ह्यात एक जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 11:42 AM

तेलंगणातून रेल्वेने तांदळाची तस्करी करून ती पिकअप व्हॅनने आणताना, ही गाडी उलटून झालेल्या अपघातात एक नागरिक जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी (दि. १६) रोजी सकाळी मूर्ती गावाजवळ घडली.

ठळक मुद्देनाल्यावर सुटले नियंत्रण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: तेलंगणातून रेल्वेने तांदळाची तस्करी करून ती पिकअप व्हॅनने आणताना, ही गाडी उलटून झालेल्या अपघातात एक नागरिक जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी (दि. १६) रोजी सकाळी मूर्ती गावाजवळ घडली.या गावातील गोसावी कान्हू पिपरे हे गृहस्थ सकाळी गावाबाहेर पायी गेले असताना एका नाल्याजवळ हे वाहन उलटले व त्याखाली दबून पिपरे यांचा मृत्यू झाला.तेलंगणातून मोठ्या प्रमाणात तांदळाची तस्करी केली जाते. राजुरा तालुक्यातील विरुर येथे आणून हा तांदूळ विकला जातो. काही महिन्यापूर्वी विरूर येथील तांदळाच्या व्यापाऱ्याच्या गोदामावर धाड टाकून मोठा साठा जप्त करण्यात आला होता.सोमवारी प्रदीप पांजा यांच्या मालकीचे पिकअप वाहन विहिरगाव रेल्वे स्थानकावरून तांदूळ घेऊन मूर्ती मार्गे विरुरला जात असताना नाल्याच्या काठावर वळण घेताना हे वाहन अनियंत्रित होऊन उलटले झाले. यात पिपरे दबून ठार झाले. मृताच्या वारसदारांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

टॅग्स :Accidentअपघात