शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
2
TATA IPL Auction 2025 Live: १८२ खेळाडूंचा लिलाव, ६३९ कोटींच्या लागल्या बोली... वाचा, दोन दिवसांत काय-काय घडलं?
3
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
4
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
5
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
6
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
7
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
8
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
9
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
10
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
11
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
12
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
13
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
14
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
15
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
16
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
17
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
18
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
19
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
20
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...

माणूस उठला पर्यावरणाच्या जीवावर !

By admin | Published: June 05, 2016 12:39 AM

पर्यावरणाशी माणसाचा अगदी जवळचा संबंध आहे. पर्यावरणाशिवाय माणूस ही संकल्पनाच करणे अवघड आहे.

जंगलतोडीने बिघडला पर्यावरणाचा समतोल : पर्यावरण संवर्धन करणे काळाची गरजप्रकाश काळे गोवरीपर्यावरणाशी माणसाचा अगदी जवळचा संबंध आहे. पर्यावरणाशिवाय माणूस ही संकल्पनाच करणे अवघड आहे. दिवसागणिक चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढणारे उद्योगधंदे, कारखाने हे जरी जिल्हावासीयांसाठी फायद्याचे ठरत असले तरी कारखान्यातून सोडण्यात येणारे विषारी वायू हे पर्यावरणासाठी घातक आहे. एकीकडे माणसाने पर्यावरणावरच घाव घातला तर दुसरीकडे पर्यावरण दूषित झाल्याने माणसाचा श्वास कोंडला जातो. चंद्रपूर जिल्ह्याचे प्रदूषण देशपातळीवर चर्चिले जात असतानाही आजवर यावर संबंधित विभागाने नियंत्रण मिळविलेले नाही.पर्यावरण हा तर सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. माणसाच्या जन्मापासून तर त्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत माणूस पर्यावरणाच्या छायेत आयुष्य जगत असतो. निसर्गाचा समतोल आज बिघडला आहे. माणसाने स्वत:च्या फायद्यासाठी जंगलावरच कुऱ्हाड चालविली. त्यामुळे वनसंपदा नष्ट झाली. आज जिल्ह्यात उद्योगधंद्याची भरमार आहे. माणसाच्या प्रगतीत उद्योगधंद्याचे योगदान महत्त्वाचे आहे, हे खरे. मात्र कारखान्यांकडून नियमांची पायमल्ली केली जात असल्याने पर्यावरणाचा समतोल दिवसेंदिवस बिघडत चालला आहे. कोणताही कारखाना सुरू करताना पर्यावरणाला धोका होऊ नये यासाठी शासनाने काही निर्बंध घालून दिले आहे. त्याचे तंतोतंत पालन करून पर्यावरणाला बाधा पोहचू नये यासाठी सर्वानी प्रयत्न करणे गरजेचे आहे. परंतु शासनाने कारखाण्यांना घालून दिलेले नियम कारखानदारांनी धाब्यावर बसविले आहे. त्यामुळे कारखाने मोठ्या प्रमाणात धूर ओकायला लागले आहे. धूळ प्रदूषण वाढल्याने माणसाचा श्वास दिवसेंदिवस गुदमरत चालला आहे. यासाठी काही सामाजिक संघटना पर्यावरण वाचवा संदेश देत पुढे आल्या आहे.पर्यावरणाच्या ऱ्हासाला खरे तर माणूसच जबाबदार आहे. माणसाने पर्यावरणाचा समतोल बिघडविल्याने निसर्ग आता लहरीपणाने वागायला लागला आहे. पर्यावरण संवर्धन करणे आज काळाची गरज असताना माणूस असा बेफीकीरीने वागायला लागला आहे की त्याने पर्यावरणाकडे दुर्लक्ष केले आहे. जिल्ह्यात सिमेंट उद्योग, पेपरमील, वीज केंद्र, वेकोलिच्या खाणी, स्टिल प्लँट यासारखे अनेक उद्योग आहेत. उद्योगांनी नदी, नाल्याचे अस्तीत्वच धोक्यात आणले आहे. त्याचा परिणाम पर्यावरणावर होऊ लागला आहे. माणसाने पर्यावरणावरच घाव घातल्याने माणसावर त्याचा अनिष्ट परिणाम होत आहे. हा सारा निसर्गाचा कोप नव्हे, पर्यावरणाचा ऱ्हास झाल्याने पर्यावरणात बदल होऊन उद्भवलेली कृत्रीम परिस्थिती आहे. पर्यावरणाचा असाच ऱ्हास होत राहिला तर एक दिवस माणसाचे अस्तित्वच धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. हा भविष्याचा धोका टाळण्यासाठी सर्वांनी पर्यावरण वाचवा चा संदेश देऊन पर्यावरणाचे संवर्धन करणे आज काळाची गरज झाले आहे.शतकोटी वृक्ष लागवडीचा फज्जाझाडांची संख्या कमी झाल्याने त्याचा पर्यावरणावर विपरीत परिणाम झाला आहे. हा एकच धागा पकडून शासनाने राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना शतकोटी वृक्ष लागवडीच्या माध्यमातून वृक्ष लागवडीचे आदेश दिले. यावर शासनाने लाखो रुपयांचा खर्च केला. मात्र शासनाच्या काही बेजबाबदार अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर करीत प्रत्यक्षात वृक्ष लागवड न करता कागदावरच वृक्ष फुलविले. यात शासनाचा शतकोटी वृक्ष लागवडीचा फज्जा उडविण्यात आला.पर्यावरण वाचवासाठी सामाजिक संघटना सरसावल्यापर्यावरण वाचविणे आज काळाची गरज आहे. यासाठी सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला असून त्या नेटाने काम करीत आहे. पर्यावरण वाचविण्यासाठी चाललेली त्यांची धडपड वाखाणण्यासारखी आहे. पर्यावरणाला वाचविणे हे सर्वाचे परमकर्तव्य आहे.