या परिसरात शासकीय रुग्णालय, पोलीस स्टेशन, लहान मुलांचे खासगी रुग्णालय, खासगी शाळा, आरोग्य विभागीय कार्यालय, विद्युत महामंडळ, ग्रामपंचायत कार्यालय आहेत. शहरातील वाहतूक या रस्त्याने वर्दळीची असून लोणवाही आणि सिंदेवाही या दोन शहरांना जोडणारा अंतर्गत रस्ता धूळखात आहे. पावसाळ्यामध्ये रस्त्यावर पावसाचे पाणी साचलेले, चिखलमय रस्ता असते. नेहमीच मुरुम व मातीचा थर टाकून तात्पुरती डागडुजी केली जाते. मातीचा वापर रस्त्यावर केल्याने धूळ उडत आहे. शाळा सुरू झाल्याने वर्दळीची वाहतूक वाढलेली आहे. संबंधित विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे.
‘त्या’ रस्त्याची नेहमी दुर्दशाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 4:25 AM