तालुक्यातील अत्यंत वर्दळीच्या रस्त्यामध्ये या रस्त्याचा समावेश आहे. गेल्या तीन वर्षापासून या रस्त्याचे काम सुरू असून अद्यापही पूर्णता पूर्ण झाले नाही. परिणामी वाहतूकदारांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. पुलांचे ही काम अर्धवट पडले असल्याने तालुक्यातील नागरिकांना कमी अंतरात पोहचण्याचा जिल्हा मुख्यालयी चंद्रपूर जाण्याचा मार्ग अडगळीत पडला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामाची गती वाढवून मार्ग त्वरित सुखकर बनवावा, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून होत आहे.
त्या मार्गावर अंतर फलकच नाही.
कोरपना - कोरपना ते वणी या प्रमुख राज्य महामार्गावर एकही दिशादर्शक व अंतर फलक नाही. त्यामुळे वाहतूकदारांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने फलक लावून नागरिकांची गैरसोय दूर करावी अशी मागणी समाज सुधारक फाऊंडेशनचे जिल्हाध्यक्ष पवार यांनी केली आहे.