माढेळी-नागरी रस्ता ठरतोय डोकेदुखीचा
शंकर नरड
माढेळी : माढेळी-नागरी रोड हा अत्यंत महत्त्वाचा आहे. पण काही दिवसांपासून या मार्गावर अत्यंत जड वाहतूक सुरू असल्यामुळे हा रस्ता अतिशय खराब झाला आहे. या मार्गची वाहतूक क्षमता २५ ते ३० टन आहे. पण मार्गावरून दरदिवशी सुमारे दोनशेहून अधिक ट्रक ७० ते ७५ टन इतकी कोळसा वाहतूक करतात.
क्षमतेपेक्षा जास्त लोडिंग असल्यामुळे या मार्गाची दुर्दशा झालेली आहे. या गोष्टीकडे कोणताच लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही. या भागातील पंचायत समिती सदस्य असो व जिल्हा परिषद सदस्य असो किंवा भागातील आमदार, खासदार असो या मार्गाकडे सर्वांनीच दुर्लक्ष केल्याचे दिसते.
मागील वर्षीदेखील अशीच वाहतूक सुरू होती. पण ती बंद करण्यात आली. पण आता यावर्षी २० दिवसांपासून ओव्हरलोड कोळसा वाहतूक सुरू आहे. एकोना कोळसा खाणीतून निघालेला कोळसा वरोरा एमआयडीसीमध्ये पोहचविण्याचे काम चड्डा ट्रान्सपोर्ट कंपनी करीत आहे. दोन दिवसांपूर्वी एक ट्रक रस्त्यात मध्येच फसला. यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
060921\img_20210905_081941.jpg
ट्रक फसल्यामुले ट्रक ची अशी लांबच लांब रांग लागली होती