ऑनलाईन लोकमतगोंडपिपरी : जिल्ह्याच्या सीमेवर वसलेला तालुका विकासापासून वंचित असताना ढिसाळ राजकारण आणि अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे विकासकामांवर अनिष्ट परिणाम होत असल्याचे निकृष्ट रस्ते बांधकामातून पुढे आले आहे. नियम डावलून बांधकाम केले जात असल्याने शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधीचा अपव्यय होत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तालुक्यात अनेक गावांमध्ये रस्ते बांधकाम सुरू आहे. मात्र, निकष डावलल्याने गुणवत्ता घसरली. सा. बां. विभागाचे अधिकारी व अभियंता विकास कामांकडे पाठ फिरवित आहे. ज्या गावांत कामे सुरू आहेत, तिथे दौरे न करताना केवळ कंत्राटदारांवर भरोसा ठेवून आहेत.राज्याचे वित्त नियोजन, अर्थ व वनमंत्री ना. मुनगंटीवार यांनी शहविकासाचा दृरदृष्टीकोन ठेवून येथील नगरपंचायतील १० कोटींचा विकास निधी दिली. सदर विकास निधी अंतर्गत शहरात रस्ते, नाल्या बांधकाम जोमात सुरु आहे. प्रथमताच या शहराला एवढा भरगच्च निधी मिळाल्याने नागरिकांमध्येही समाधान व्यक्त केल्या जात होते.मात्र सदर निधी सा.बां. विभागाकडे वळते झाल्याने शहरातील निर्माण झालेले अनेक सिमेंट रस्ते अंदाजपत्रकानुसार नसून प्रत्यक्ष कामांवर उपस्थित न राहणाऱ्याअभियंत्यांनी कंत्राटदारांशी साटेलोटे करुन थातूरमातूर केले़ परिणामी, काही दिवसांपूर्वी नगरसेवकांनी चौकशीची मागणी केली होती. मात्र, वरिष्ठांनी दखल घेतली नाही़ वरिष्ठांचा तपासणी दौरा सुरू होणार असल्याचे पाहून मार्गावरील खड्डे बुजविण्यात आले. शहरातील मुख्य मार्ग व इतर मार्गावर खड्डे जैसे-थे असल्याचे दिसून येत आहे़ शासकीय इमारतीचे देखभाल व दुरुस्ती काम करीत असताना प्रशासकीय तांत्रिक मंजूरी आणि करारनाम्यातील अटींचे पालन केले जात नाही़ या प्रशासकीय बाबी रितसर पूर्ण करण्याअगोदरच मर्जीतील कंत्राटदारांना कामे वाटपाचा प्रतापही तालुक्यात घडला आहे़गोंडपिपरी ते धाबा मार्गावर अनेक खड्डे आहेत़ गोंडपिपरी ते वढोली कोठारी, गोंडपिपरी ते मूल मार्गाचीही स्थिती वाईट आहे़ या मार्गावर सातत्याने डागडुजीची कामे करून कोट्यवधी रुपयांची देयके उचलली जात आहे़ तालुक्यातील विविध रस्त्यांची डागडुजी, खडीकरण डांबरीकरण कामांवर या विभागाने कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला़ ही कामे सुरू असताना संबंधित अधिकाºयांनी घटनास्थळाची पाहणीदेखील केली नाही़ यावरून रस्ते बांधकाम निष्कृष्ट झाल्याचे बोलले जात आहे. याची चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे़तरच खरा विकासतालुक्याच्या विकासासाठी शासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे़ यातून अनेक गावांमध्ये कामे सुरू आहेत़ मात्र, नियमांचे उल्लंघन न करता ही कामे पूर्ण करावी, अशी मागणी नागरिकांनी केली़ काही लोकप्रतिनिधी या प्रश्नाकडे कानाडोळा करीत असले तरी नियमाधिन कामांतूनच तालुक्याचा विकास होईल़
रस्ते बांधकामात मोठ्याप्रमाणात घोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 1:16 AM
जिल्ह्याच्या सीमेवर वसलेला तालुका विकासापासून वंचित असताना ढिसाळ राजकारण आणि अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे विकासकामांवर अनिष्ट परिणाम होत असल्याचे निकृष्ट रस्ते बांधकामातून पुढे आले आहे.
ठळक मुद्देविभागाचे दुर्लक्ष : कंत्राटदारांना रान मोकळे