शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

रस्ता सुरक्षा अभियान ही लोकचळवळ व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2019 10:45 PM

रस्ते अपघात हे देशापुढील मोठे आव्हान असले तरी शासनस्तरावर वाहतूक नियमांवर प्रभावी अंमल व वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर ठोस उपाययोजना राबविल्या गेल्यास अपघातांच्या संख्येत आमुलाग्र घट शक्य आहे. वाहतूक विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी रस्ता सुरक्षा अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप दिल्यास या अभियानाची फलनिष्पत्ती दखलपात्र ठरेल, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.

ठळक मुद्देहंसराज अहीर : अपघाताचे प्रमाण वाढले; वाहतूक नियमांचे पालन करा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : रस्ते अपघात हे देशापुढील मोठे आव्हान असले तरी शासनस्तरावर वाहतूक नियमांवर प्रभावी अंमल व वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर ठोस उपाययोजना राबविल्या गेल्यास अपघातांच्या संख्येत आमुलाग्र घट शक्य आहे. वाहतूक विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी रस्ता सुरक्षा अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप दिल्यास या अभियानाची फलनिष्पत्ती दखलपात्र ठरेल, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.जिल्हा रस्ता सुरक्षा समिती चंद्रपूरद्वारा पोलीस मुख्यालयाच्या ड्रील शेड येथे आयोजित ३० व्या रस्ता सुरक्षा अभियानाच्या उदघाटनप्रसंगी ना.अहीर बोलत होते. ते म्हणाले, वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी, अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, प्रदूषणावर आळा बसावा, अनियंत्रित वाहन चालविणाºयांवर प्रतिबंध बसावा, याकरिता केंद्र व राज्य शासनाने अनेक कडक नियम अंमलात आणले आहे. वाहतूक नियमांचा भंग करणाºयांविरूध्द मोठ्या प्रमाणात दंडात्मक कार्यवाहीची तरतूद करण्यात आली आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी तसेच राज्य शासन रस्ते अपघातांची संख्या कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजनांवर कटाक्षाने अंमल करण्याबाबत आग्रही आहे. त्यामुळे अपघातांचे आकडे कमी झाले असले तरी सामाजिकदृष्टया अपघाताचे हे गांभीर्य चिंतेत भर घालणारे असल्याने अधिकारी, कर्मचारी, विविध क्षेत्रातील जबाबदार नागरिकांनी पुढाकार घ्यावा. तसेच शाळा, महाविद्यालयीन स्तरावर सुरळीत वाहतुकीसंदर्भात तसेच अपघातांच्या पार्श्वभूमीवर जागृती व्हावी, यावर भर देत ना. अहीर यांनी जनजागृतीसाठी पथनाटय हे प्रभावी माध्यम ठरू शकते, असे सांगितले.यावेळी ना. हंसराज अहीर यांना पथसंचालनाद्वारे मानवंदना देण्यात आली. पथनाटयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी वाढत्या अपघातांवर नियंत्रण घालण्यासाठी जनजागृती केली. यावेळी निघालेल्या रॅलीला हिरवी झेंडी दाखवून ना. अहीर यांनी रॅली रवाना केली. या कार्यक्रमाला महापौर अंजली घोटेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वंभर शिंदे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी शांताराम फासे, वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण यांच्यासह वाहतूक, पोलीस, कर्मचारी आदींची उपस्थिती होती. चंद्रपूर महानगरातील १२ शाळांचे विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले होते. यावेळी स्वयंसेवी संघटनांचे प्रतिनिधी, शिक्षक, पालकांची उपस्थिती होती.पाल्यांना वाहन देताना काळजी घ्यारस्ता सुरक्षा हे संबंधित विभागाचे कर्तव्य असले तरी सामाजिक पातळीवर लोकांची याबाबतीत जबाबदारी अनिवार्य ठरते, असे ना. हंसराज अहीर यांनी सांगितले. पालकांनी आपल्या पाल्यांच्या हातात वाहने सोपवितांना त्यांचे वय, वाहतूक नियमांचे ज्ञान व वाहन विषयक त्याची मानसिकता, आकलन याबाबत गांभिर्याने विचार करूनच पाल्यांच्या हातात वाहने सोपवावी, असे आवाहनही त्यांनी केले.