प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढला
चंद्रपूर शहरात दिवसेंदिवस प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढत आहे. स्थानिक बाजार परिसर व अन्य ठिकाणी गरज नसतानाही प्लास्टिक पिशव्या दिल्या जातात. या पिशव्या कुठेही टाकून दिल्या जात असल्याने पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे. याकडे मनपा प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.
कव्हरेजअभावी भ्रमणध्वनी सेवा ठप्प
चंद्रपूर : शहरासह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात भ्रमणध्वनी ग्राहक आहेत. मात्र, मागील अनेक दिवसांपासून कव्हरेजची समस्या निर्माण झालेली आहे. त्यामुळे भ्रमणध्वनीधारक त्रस्त झालेले असून अनेकांनी सीमकार्ड बदलवून नवीन सीम खरेदीला पसंती दिली आहे. गेल्या काही महिन्यांपासून काही कंपन्यांच्या नेटवर्कमध्ये समस्या निर्माण झाली आहे.
स्मशानभूमींची दुरवस्था
चंद्रपूर : गाव तिथे स्मशानभूमी आहे. मात्र, अनेक गावांतील स्मशानभूमीला रस्त्यांची समस्या आहे. त्यामुळे दुरवस्थेतील स्मशानभूमी जिल्हा प्रशासनाने दुरुस्त कराव्या, अशी मागणी होत आहे.
विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त
घुग्घुस : परिसरात वीजपुरवठा नेहमी खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. या समस्येकडे वीजवितरण कंपनीचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिकांची अनेक शासकीय कामे खंडित होत आहे, याकडे वरिष्ठ अधिका-यांनी लक्ष देण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.