लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: जिल्हा परिषद अंतर्गत केलेल्या रस्त्यांच्या कामांची देयके राज्य गुणवत्ता निरीक्षकांच्या चमूने चौकशी केल्यानंतरच अदा केली जाणार आहे.जिल्हा परिषद सभागृहात ७ जून रोजी पार पडलेल्या बांधकाम समितीच्या बैठकीत ही माहिती देण्यात आली. तसा ठराव यापूर्वीच मंजूर करण्यात आला आहे. यामुळे १५ टक्के कमी दर असलेल्या कंत्राटदारांना कामांचा दर्जा उत्तम ठेवावा लागणार आहे. ग्रामीण भागात दळणवळणासाठी रस्त्यांची कामे मुख्यत्वे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून केली जातात. याआधी कंत्राटदारांकडून ही कामे योग्यरीत्या केली जात नव्हती. त्यामुळे अल्पावधीतच रस्ते उखडत होते. त्याअनुषंगाने तक्रारी जिल्हा परिषदकडे येत होत्या. त्यावर उपाय म्हणून जिल्हा परिषदेने १५ टक्के कमी दर असलेल्या रस्त्यांच्या कामांची राज्य गुणवत्त निरीक्षक (स्टेट क्वॉलिटी कंट्रोल मॉनिटरी) कडून चौकशीअंतीच त्या कामांचे देयके देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मागील आठवड्यात या चमूने जिल्ह्यातील काही कामांची चौकशी केली. तसा अहवाल जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला सादर केला.
चौकशीअंतीच मिळणार रस्त्यांच्या कामांची देयके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 10:52 PM
जिल्हा परिषद अंतर्गत केलेल्या रस्त्यांच्या कामांची देयके राज्य गुणवत्ता निरीक्षकांच्या चमूने चौकशी केल्यानंतरच अदा केली जाणार आहे.
ठळक मुद्देबांधकाम विभाग : जि.प.च्या बैठकीत माहिती