शहरं
Join us  
Trending Stories
1
त्या घटनेच्या प्रतीला 'लाल' कव्हर, राहुल गांधींना अर्बन नक्षल्यांनी घेरलंय; फडणवीसांचा थेट हल्ला
2
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
3
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!
4
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
5
फक्त २ 'परदेशी'; पंत, KL राहुल अन् श्रेयससह लिलावात सर्वाधिक मूळ किंमतीसह नाव नोंदणी करणारे खेळाडू
6
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
7
'या' शेअरचं ट्रेडिंग बंद; कंपनीवर आहे प्रचंड कर्ज; ₹३४८ वरून ₹३४ वर आली किंमत
8
गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांचे निधन; आज होणार अंत्यसंस्कार
9
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 
10
अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल भिडणार! नवीन पोस्टर पाहून अंगावर येईल काटा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
12
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
13
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
14
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
15
US Election Share Market : ट्रम्प यांच्या पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत, भारतीय शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,३०० च्या वर
16
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
17
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
18
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'चं पहिलं पोस्टर समोर! सिनेमाचा सीक्वलही येणार, कधी प्रदर्शित होणार चित्रपट?
20
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ

आरटीओ विभागाला ७६ कोटींचा महसूल

By admin | Published: April 08, 2017 12:49 AM

राज्य शासनाने दिलेले उद्दिष्ट ९८.२३ टक्क्यांनी पूर्ण करताना चंद्रपूर उपप्रादेशिक कार्यालयाने तब्बल ७६.९२ कोटींचा महसूल गोळा केला आहे.

उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल : चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची कामगिरीचंद्रपूर : राज्य शासनाने दिलेले उद्दिष्ट ९८.२३ टक्क्यांनी पूर्ण करताना चंद्रपूर उपप्रादेशिक कार्यालयाने तब्बल ७६.९२ कोटींचा महसूल गोळा केला आहे.२०१४-१५ या वर्षीच्या तुलनेत यावर्षी महसूलात तब्बल १७ कोटींची म्हणजेच ११.५० टक्क्यांनी वाढ झाली असून कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे योग्य समन्वय व चांगल्या कामगिरीमुळेच एवढे महसूल गोळा करण्यात यश आल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांनी दिली. चंद्रपूर उपप्रादेशिक कार्यालयाने २०१४-१५ मध्ये ५९.४२ कोटी, २०१५-१६ मध्ये ६८.९८ कोटीचे महसूल राज्य शासनाला मिळवून दिले होते. मात्र यावर्षी या महसूलात गतवर्षीपेक्षा ७.९४ कोटींनी वाढ झाली आहे. यामध्ये वाहन परवाना, नोंदणी, थकीत करवसुली, चालान, परवाना कर आदींचा समावेश आहे. राज्य शासनाने चालू वर्षांत ७८.९३ कोटींचे महसूल गोळा करण्याचे उद्दीष्ट दिले होते. यापैकी ७६.९२ कोटींचा महसूल गोळा करण्यात चंद्रपूर उपप्रादेशिक कार्यालयाला यश आले आहे. चंद्रपूर आरटीओने २०१५-१६ या वर्षात दंडात्मक कारावई करून १ कोटी ४० लाखांचा महसूल गोळा केला होता. तर चेकपोस्ट तपासणीद्वारे २ कोटी ६८ लाखांचे महसूल मिळविले होते. यात २०१६-१७ या वर्षांत मोठी वाढ झाली आहे. या वर्षांत दंडात्मक कारवाई करून १ कोटी ९० लाख महसूल गोळा झाले. यात गतवर्षीपेक्षा ३६ टक्क्यानी वाढ झाली आहे. तर चेकपोस्ट तपासणीद्वारे ३ कोटी १८ लाखांचा महसूल गोळा केला ही १९ टक्क्यांनी वाढ आहे. (स्थानिक प्रतिनिधी)ओव्हरलोड प्रकरणात सव्वा कोटी वसूलओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांवर आरटीओची नेहमीच नजर असते. अशा वाहनांवर कारवाई करून २०१५-१६ या वर्षांत ७५ लाखांचा महसूल मिळाला होता. यावर्षी या महसूलात मोठी वाढ झाली असून तब्बल ४५० वाहनांवर कारवाई करून १ कोटी ३० लाखांचा महसूल गोळा करण्यात आला आहे. वाहनाच्या लिलावाद्वारे ९ लाखांचा महसूलअनेक प्रकरणात वाहने जप्त केली जातात. मात्र काही जण दंडात्मक रक्कम भरून वाहन सोडवत नाही. जप्त असलेल्या अशा ३५ वाहनांचा आरटीओंनी लिलाव काढला. यात ९.२५ लाखांचा महसूल मिळाला आहे. तर थकीत कर वसुलीच्या माध्यमातून २०१५-१६ या वर्षात १० लाखांचा महसूल मिळाला होता. यात मोठी वाढ होऊन २०१६-१७ या वर्षांत ७० लाखांचा महसूल प्राप्त झाला आहे. व्हीआयपी व आर्कषक नंबरवर ३६ लाखांचा महसूलअनेक वाहनधारकांना विशेष आर्कषक नंबर व व्हीआयपी नंबरचे क्रेझ असते. यासाठी अधिकचे शुल्क मोजून नंबर मिळविता येते. २०१५-१६ या वर्षांत अशाप्रकारचे ४०० नंबर देण्यात आले. यातून ३० लाखांचे महसूल मिळाले होते. तर २०१६-१७ या वर्षांत ४७० क्रमांक वाटप करून ३६ लाखांचे महसूल मिळाले आहे. कर्तव्यावरील अधिकारी व कार्यालयीन व इतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळेच या वर्षीचे महसूल गोळा करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करता आले. बीएस-३ वाहनांच्या नोंदणीसाठी माझ्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी रात्री उशिरापर्यंत काम केले. त्यामुळे यावर्षी महसुलात बरीच वाढ झाली आहे. वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे पालन करून वाहने चालवावीत व आपल्यावर होणारी दंडात्मक कारवाई टाळावी. - विनय अहीरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, चंद्रपूर.