शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मोफत’ घोषणांचा सपाटा; वित्तीय भार पेलणार कसा? राज्यावर आताच आहे साडेसात लाख कोटींचे कर्ज
2
आजचे राशीभविष्य, ७ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक प्रसन्नता जाणवेल
3
EVM हॅक करून तुम्हाला जिंकून देतो; ५ लाख न दिल्यास पराभव करेन, उद्धवसेनेच्या उमेदवाराकडे मागितली खंडणी
4
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
5
वरळीत वरचष्मा कोणाचा? आदित्य ठाकरे विरुद्ध देवरा आणि देशपांडेंच्या उमेदवारीमुळे रंगत
6
Ind Vs Aus: "ऑस्ट्रेलिया भारताला ३-१ ने नमवेल", रिकी पाँटिंगने केलं भाकित
7
महिलांना दरमहा ३ हजार रुपये, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची गॅरंटी
8
बुरखा घालून मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेला बेड्या, लोहमार्ग पोलिसांकडून साथीदारालाही अटक
9
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
10
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
11
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
12
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
14
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
15
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
16
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
17
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
18
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
19
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर

बिनधास्तपणे काढली जाते गुळाची दारू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 11:21 PM

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू झाली आहे. असे असतानाही जिवती तालुक्यातील मुकादमगुडा, घटकरगुडा नाल्यावर खुलेआम हातभट्टी लाऊन दारू काढली जात असल्याचे ‘लोकमत’ ने आज सोमवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून उजेडात आले आहे.

ठळक मुद्देपोलीस हतबल : कमी पैशात अधिक नशा आणणारी दारू

शंकर चव्हाण / संघरक्षित तावाडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू झाली आहे. असे असतानाही जिवती तालुक्यातील मुकादमगुडा, घटकरगुडा नाल्यावर खुलेआम हातभट्टी लाऊन दारू काढली जात असल्याचे ‘लोकमत’ ने आज सोमवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून उजेडात आले आहे. ही दारू नंतर परिसरातील गावागावात विक्रीसाठी पोहोचवली जाते.दारूच्या व्यसनापायी अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहे. युवा वर्गात या व्यसनाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जिल्ह्यात दारूबंदी झाली. मात्र पोलिसांकडून त्याची अंमलबजावणी पाहिजे तशी केली जात नाही. तालुक्यातील मुकादमगुडा व घटकरगुडा येथे प्रस्तुत प्रतिनिधींनी स्टिंग आॅपरेशन केले असता नाल्यावर खुलेआम चूल पेटवून दारू काढली जात असल्याचे दिसून आले. या दारूची परिसरातील गावात वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली.फोनवर मिळते घरपोच सेवापहाडावरील कुंभेझरी, जिवती, परमडोली अशा काही गावात फोन केल्यानंतर घरपोच दारू पुरवठ्याची व्यवस्था केली जात असल्याची माहिती काही नागरिकांकडून ऐकायला मिळाली.पोलिसांची गस्त फक्त नावापुरतीचपरमडोली, मुकादमगुडा, ठक्करगुळा परिसरात वणी (बु) पोलिसाकडून गस्त केली जाते. ती फक्त नावापुरती दाखवून गावात वचक निर्माण करायचा आणि नंतर हातभट्टी व्यवसायाकडून हप्ता जमवायचा, असा प्रकार वणी (बु) पोलीस कॅम्पमधील एका पोलिसांकडून सुरू असल्याची माहिती आहे.ज्वारी, रासायनिक खत व कीटकनाशकाचा वापरमोहफुलाची आणि गुळाची दारू सहजपणे गावागावात मिळत असली तरी जास्त नशा आणण्यासाठी त्यात ज्वारी, रासायनिक खत व कीटकनाशक असे घातक पदार्थ वापरत आहेत. लोकांना कमी पैशात अधिक नशा या दारूने येत असली तरी ही दारू विषापेक्षाही घातक आहे.