साईनाथ कुचनकार ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चूल आणि मूल या चौकटीतून बाहेर पडून गाव ते राष्ट्रीय पातळीवरील नेतृत्व समर्थपणे पेलत पाळण्याचीच नव्हे; तर ग्रामीण विकासाचीही दोरी महिलांच्या हाती आली आहे. त्या गावाच्या उद्द्धारकर्त्या झाल्या आहेत. जिल्ह्यातील ८२८ पैकी ५५३ म्हणजेच निम्म्यापेक्षा अधिक ग्रामपंचायतींची सूत्रे महिलावर्ग यशस्वीरित्या सांभाळत आहेत. त्या गावविकासाला चालना देत आहेत.महिला केवळ औपचरिकता म्हणून विविध पदावर विराजमान होतात. कारभार मात्र त्यांचे पतीदेवच चालवितात, असा काहीसा गैरसमज होता. हा गैरसमजही आता महिलावर्ग खोटा ठरवत आहे.महिलांचा थेट संबंध स्वच्छता, काटकसर आणि शिक्षणाशी जोडला जातो. तो सार्थ ठरवित जिल्ह्यातील महिलांनी गावाचा झपाट्याने विकास सुरू केला आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये ८२८ ग्रामपंचायती आहेत. यापैकी तब्बल ५५३ ग्रामपंचायतींचा कारभार महिलांच्या हातात आहे. यामध्ये सर्वाधिक ६१ महिला सरपंच चिमूर तालुक्यात आहे. त्यापाठोपाठ ब्रह्मपुरी ५३, वरोरा ५२, भद्रावती ४५, नागभिड ४४, गोंडपिपरी ४१, सावली ४०, सिंदेवाही ३५, कोरपना ३५, राजुरा ३३, चंद्रपूर ३२, जिवती १६ आणि बल्लारपूर तालुक्यामध्ये १० ग्रापंचायतींचा कारभार महिला सरपंच चालवित आहेत.अनेक गावात दारूबंदीचा ठरावजिल्ह्यात महिला सरपंच तसेच सदस्य संख्या जास्त असल्याने अनेक गावांत दारुबंदीचा ठराव पारित करण्यात आला. एवढेच नाही तर गावातील अवैध धंदेही बंद करण्यात महिला सदस्यांना यश मिळाले आहे. त्यामुळे गावातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाले असून विकासाची दिशा मिळाली आहे.ग्रामसभांमध्ये लक्षणीय उपस्थितीग्रामसभा घेताना अनेकदा पुरुषांची मक्तेदारी असायची. मात्र ५० टक्के आरक्षण लागू झाल्याने सरपंचासह महिला सदस्यांची संख्या वाढली. यातून पुरूषी मक्तेदारी मोडीत निघत आहे. महिला सदस्यांच्या प्रोत्साहनामुळे ग्रामसभेला महिलांची उपस्थितीही लक्षणीय असते.महिला सरपंच म्हणून गावाचा विकास करताना अनेक अडचणी येतात. या अडचणीवर मात करून गावात विविध योजना राबविल्या जात आहे. स्वच्छता अभियान, आरोग्य सेवा एवढेच नाही तर बचतगटाद्वारे महिलांना स्वयपूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.- वंदना चवले, सरपंच, कुकूळसात
ग्रामीण विकासाची दोरी महिलांच्या हाती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2019 12:31 AM
चूल आणि मूल या चौकटीतून बाहेर पडून गाव ते राष्ट्रीय पातळीवरील नेतृत्व समर्थपणे पेलत पाळण्याचीच नव्हे; तर ग्रामीण विकासाचीही दोरी महिलांच्या हाती आली आहे. त्या गावाच्या उद्द्धारकर्त्या झाल्या आहेत. जिल्ह्यातील ८२८ पैकी ५५३ म्हणजेच निम्म्यापेक्षा अधिक ग्रामपंचायतींची सूत्रे महिलावर्ग यशस्वीरित्या सांभाळत आहेत.
ठळक मुद्दे८२८ पैकी ५५३ गावांमध्ये महिलाराज : दीर्घकालीन विकास कामांसाठी घेताहेत धाडसाने निर्णय